बोगस भरती प्रक्रियेवरुन मनपा महासभेत नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:30 PM2019-12-31T22:30:30+5:302019-12-31T22:31:01+5:30

कारवाई मागणी : एस.सी. व एस.टी. प्रवर्गावर अन्याय झाल्याचा आरोप

 Corporal aggressor in municipal corporation over bogus recruitment process | बोगस भरती प्रक्रियेवरुन मनपा महासभेत नगरसेवक आक्रमक

Dhule

Next


धुळे : महापालिकेत झालेल्या भरती प्रक्रियेत एस.सी., एस.टी. प्रवर्गासाठी राखीव जागेवर नियमानुसार भरती न करता अधिकाऱ्यांनी बोगस भरती केली. या बोगस भरती प्रक्रियेमुळे एस.सी., एस.टी. प्रवर्गावर अन्याय झाला आहे. या प्रकरणी आयुक्तांनी खुलासा द्यावा, अशी मागणी नगरसेवक नागसेन बोरसे यांनी केली.
महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात मंगळवारी महापालिकेची महासभा घेण्यात आली. यावेळी विषय पत्रिकेवरील १३ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी १३ विषयांवर चर्चा होऊन एकमताने विषय मंजूर करण्यात आले. दरम्यान, सभेत गैरहजर राहणारे सदस्य तसेच विकास कामांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.
बोगस भरतीची चौकशी करा
१९७६ मध्ये महापालिकेत झालेल्या भरती प्रक्रियेत एस़टी़, एस.सी़ राखीव पदावर जागेवर मनपा आस्थापना विभागाचे नारायण सोनार यांची भरती तीन वर्षासाठी तात्पूर्ता स्वरूपासाठी करण्यात आली होती़ त्यांची बढती होऊन त्यांना आस्थापना विभागाचे सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आले़ अधिकाऱ्यांनी पात्रता नसतांना सोनार यांची भरती व बढती केली आहे़ भरती प्रक्रियेची चौकशी होण्याची वारंवार मागणीही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगसेवक नागसेन बोरसे यांनी केला़ सोनार यांची भरती प्रक्रि येची माहिती घेऊन पुढील बैठकीत खुलासा केला जाईल असे आयुक्त अजिज शेख यांनी सांगितले़
म्हणून गोसावीनी मारली दांडी
कचरा संकलन करणाºया ठेकेदाराकडून वारंवार महापालिकेच्या कराराचे उल्लंघन होत असल्याने त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी गेल्या २ सभेपासून नगरसेवक शितल नवले यांनी लावून धरली आहे़ ८ ते १० महिन्यापासून वॉटर ग्रेस कंपनीच्या ठेकेदाराकडून घंटागाडीना जीपीएस प्रणालीनुसार मार्ग, थांबे, तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था झालेली नाही़ याबाबत उपायुक्त शांताराम गोसावी यांच्याकडे १५ दिवसांपूर्वी पत्र दिले होते़महासभेत पुन्हा कचरा ठेकेदाराचा प्रश्न उपस्थित होईल़ म्हणून गोसावीनी दांडी मारली असा आरोप नगरसेवक नवले यांनी केला़
हेमा गोटे यांचे पद रद्द करा
महासभेत वारवांर गैरहजर राहणाºया माजी आमदार अनिल गोेटे यांच्या पत्नी हेमा गोटे यांचे नगरसेवक रद्द करण्याची मागणी दोन ते तीन महासभेपासून नगरसेवक हिरामन गवळी यांनी लावून धरली आहे़ यावर खुलासा करतांना नगरसचिव मनोज वाघ यांनी हा विषय महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे़ योग्य निर्णय पुढच्या सभेत घेण्यात येणार असल्याचे सांगितले़
शाहू नाट्य मंदिर प्रश्न गाजला
नाटयप्रेमींना व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी मनपाने शाहू महाराज नाट्य मंदिर उभारले आहे़ या मंदिराचा ठेका २०१३ पासून कोणत्या कंपनीला किती वर्षासाठी व भाड्यापोटी किती रूपये मनपाकडे जमा झाले आहे़ याबाबत चौकशीची मागणी उपमहापौर कल्याणी अंपळकर, नगरसेवक सुनिल बैसाणे यांनी केली़
त्या ठेकेदारावर कारवाई करा
माजी आमदार गोटे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाºया पांझरा नदीकाठावरील रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ऐजाज शाह यांनी विकास कामामध्ये अडथडा ठरणारे १० ते १२ शौचालय पाडले आहे़ त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे़ मनपाने त्या ठेकेदारावर कारवाई करावी तसेच शौचालयाचे बांधण्यात यावी अशी मागणी नगरसेवक भगवान गवळी यांनी केली आहे़

Web Title:  Corporal aggressor in municipal corporation over bogus recruitment process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे