दूषित वायुची बाधा तिघांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 09:32 PM2017-08-06T21:32:44+5:302017-08-06T21:33:27+5:30

एमआयडीसी परिसरातील घटना : सहा बाधीत रुग्णांवर उपचार सुरु

Corruption of air pollution in dhule | दूषित वायुची बाधा तिघांविरुध्द गुन्हा

दूषित वायुची बाधा तिघांविरुध्द गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देएमआयडीसी आवारात शनिवारी रात्री घडला होता प्रकारसहा जणांना झाली होती दूषित वायूची बाधामोहाडी पोलिसात नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अवधान एमआयडीसी येथे शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दूषित वायुची बाधा सहा जणांना झाल्याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळ्यानजिक असलेल्या अवधान एमआयडीसी येथील वसाहतीत रसायनाचे रिकामे ड्रम भंगारात काढण्यासाठी ठेवण्यात आले होते़ ते मोडत असताना त्यातील एका ड्रममधून वायुची गळती होऊन सहा जणांना श्वासाचा त्रास झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला होता़ हा प्रकार बालाजी ट्रान्सफोर्टसमोरील मोकळ्या जागेत घडला़ त्यावेळी ड्रम तोडत असताना उग्र वासाचा त्रास झाल्याने इरफान खान सिकंदर खान, महेमूद शाह इस्माईल शाह, शफिक शाह सत्तार शाह, मुजीद्दीन खान नासीर पठाण, फारुख शेख रहेमान शेख, झुबेर खान नासीर खान यांना त्रास झाला होता़ त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ 
याबाबत मुजोद्दीन खान नासीर खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मोहाडी पोलीस स्टेशनला बालाजी ट्रान्सपोर्टचे मालकासह इरफान खान, सिकंदर खान, काल्या (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुध्द संशयावरुन भादंवि कलम २८४, ३३७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात झाला आहे़ घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक दहिहंडे करीत आहेत़ 

Web Title: Corruption of air pollution in dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.