कवडीमोल भावात कापूस विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:57 AM2019-02-12T10:57:35+5:302019-02-12T10:58:19+5:30
अर्थे परिसर : कापसाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्थे : कापसाला योग्य भाव नसल्याने शिरपूर तालुक्यातील अर्थे परिसरातील शेतकºयांचा अपेक्षाभंग झाला आहे. अखेर स्थानिक व्यापाºयांना मिळेल त्या दराने कापूस विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे.
खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी असतानाही परिसरातील शेतकºयांनी शेतात कापूस लागवड केली. कुपनलिकेतील जेमतेम पाण्याचा वापर करीत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून कमी पाण्यावर कापसाचे उत्पन्न घेतले. परंतू यावर्षी कापसाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कापसाचा भाव वाढेल या आशेने शेतकºयांनी घरातच कापूस साठवून ठेवला होता. परंतू मकरसंक्रांतीनंतरही कापसाचे भाव न वाढल्याने कापूस घरातच पडून आहे.
साठविलेल्या कापसाला कीड
शेतात आलेला कापूस घरातच दोन ते तीन महिने पडल्यामुळे या कापसाला किड लागली आहे. यामुळे शेतकºयांच्या कुटुंबातील सदस्यांना बारीक पुटकुळ्या येत आहेत. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
शेतकºयांच्या घरात वेचणीनंतर जेव्हा कापूस आला तेव्हा कापसाचे भाव सहा ते सात हजाराच्या पुढे होते. कापसाच्या भावात अजून वाढ होईल, या आशेने शेतकºयांनी आपल्या घरातच कापूस भरून ठेवला होता. मात्र, जागतिक बाजारपेठेत व भारताशेजारील देशात कापसाला उठाव नसल्याने भाव घसरले आहेत. कापसाचे भाव ५४०० ते ५५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. भाव वाढतील, या आशेने शेतकरी अजूनही कापूस विकायला तयार नाहीत. त्यामुळे घरातील कापसाला कापसाला किडे लागले आहेत. यामुळे उन्हाळ्याच्या अगोदर कापूस जर विकला गेला नाही तर शेतकºयांना कापसामुळे विविध त्वचारोगांना सामोरे जावे लागणार आहे.
यावर्षी कापसाची लागवड जास्त झाली. मात्र, त्यापटीत उत्पन्न कमीच मिळाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे भाव सात ते आठ हजार रुपयांपर्यंत पोहोचतील, या आशेने शेतकºयांनी कापूस आपल्या घरातच साठविला.
अर्थे परिसरासह शिरपूर तालुक्यात शासनाकडून बाजार समितीत व इतर ठिकाणी कापसाची खरेदी होताना दिसत नाही. त्यामुये मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील व स्थानिक व्यापाºयांना कापूस विकण्याकडे शेतकºयांचा कल आहे. येत्या काही दिवसात योग्य भाव न मिळाल्यास मिळेल त्या दराने कापूस विकण्याशिवाय शेतकºयांपुढे पर्याय उरलेला नाही.