बनावट दारुचा मिनी कारखाना उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 09:54 PM2019-12-30T21:54:46+5:302019-12-30T21:55:12+5:30

एक जण ताब्यात : ३२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत, आझादनगर पोलिसांची कामगिरी

Counterfeit gourmet mini factory demolition | बनावट दारुचा मिनी कारखाना उद्ध्वस्त

बनावट दारुचा मिनी कारखाना उद्ध्वस्त

Next

धुळे : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आझादनगर पोलिसांच्या पथकाने जुने धुळे परिसरातून बनावट दारुचा मिनी कारखाना रविवारी रात्रीच उद्ध्वस्त केला़ ३२ हजारांची दारु नष्ट करण्यात आली़ यावेळी बूच, पॅकिंग मशीनसह बाटल्या, ड्रम असे विविध साहित्य जप्त करण्यात आले़ याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले़
जुने धुळ्यात बनावट दारुचा कारखाना सुरु आहे़ याठिकाणी बनावट देशी-विदेशी दारु तयार केली जात आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर आझादनगर पोलिसांच्या पथकाने धाव घेऊन रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सापळा लावला़ जुने धुळे भागात असलेल्या सूर्य मंदिराच्या जवळ एक व्यक्ती त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या झाडा-झुडूपात खोके ठेवताना दिसून आला़ त्यावरुन पथकाने सागर गणेश परदेशी (२५, रा़ देविदास नगर, जुने धुळे) या संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले़ त्याच्याकडे असलेली ३२ हजार ५४९ रुपये किंमतीची देशी-विदेशी दारुचा साठा, दारुच्या बाटल्या, बाटलीचे बूच, रसायन व बूच सिलबंद करण्याचे मशिन, ड्रम असे विविध साहित्य मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले़ त्याच्या विरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ), (फ), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकातील दीपक पाटील, संजय सूर्यवंशी, सुनील पाथरवट, रमेश माळी, मनोज पाटील, संजय भोई, शोएब बेग, अतीक शेख, डी़ बी़ मालचे, जे़ बी़ भागवत, सागर सोनवणे, संतोष घुगे आणि महिला कर्मचारी वाडीले यांनी ही कारवाई केली़
आझादनगर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल डी़ आऱ पाटील घटनेचा तपास करीत आहेत़

Web Title: Counterfeit gourmet mini factory demolition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे