तरस व शेळी मृतावस्थेत आढळली
By admin | Published: February 12, 2017 01:03 AM2017-02-12T01:03:36+5:302017-02-12T01:03:36+5:30
वैजाली-प्रकाशा रस्ता : वाहनाच्या धडकेने तरस ठार झाल्याचा अंदाज
प्रकाशा : वैजाली- प्रकाशा रस्त्यावर शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तरस मृतावस्थेत आढळून आला तर रस्त्याच्या दुसºया बाजूला शेळीही मृतावस्थेत आढळून आली. वाहनाच्या धडकेने हा तरस ठार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत वृत्त असे की, गेल्या महिनाभरापूर्वी प्रकाशा येथील बॅरेज कॉलनीजवळ तरस आढळून आला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास प्रकाशा-वैजाली रस्त्यावर डाव्या बाजूला तरस मृतावस्थेत आढळून आला. दुसºया बाजूला अर्धवट खाल्लेली शेळीही आढळून आली. याबाबत प्रकाशा दूरक्षेत्राचे पो.कॉ.वंतू गावीत यांना माहिती देण्यात आली. त्यांनी शहादा येथे वनविभागाच्या अधिकाºयांना माहिती दिल्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास वनपाल अनिल बोराडे, किसन वसावे, एस.आर. पाटील, सुभाष मोकाडे, भुरा ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले. मृत झालेल्या तरसाला कोणी घेऊन जाऊ नये म्हणून ते रात्रभर तेथेच थांबून होते. शनिवारी सकाळी वैजाली येथील पशुवैद्यकीय अधिकारी देशमुख यांना बोलविले. त्यांनी तरसाचे जागेवरच शवविच्छेदन केल्यानंतर त्याला जाळण्यात आले. या वेळी वनपाल अनिल बोराडे, वनरक्षक पी.आर. वाघ, मनीषा मराठे, ईलान गावीत, किसन वसावे, एस.आर. पाटील, गुलाबसिंग वसावे, जगन्नाथ कोळी, सरपंच भावडू ठाकरे, रफीक खाटीक, दिलीप चौधरी आदी उपस्थित होते.
याबाबत वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी सांगितले की, तरस हा आळशी प्राणी असतो. तो सहज मिळेल अशा अन्नाच्या शोधात असतो. त्यामुळे रस्त्यालगतच्या चारीत एक शेळी मृतावस्थेत पडलेली होती. ती खाण्यासाठी आला असावा. त्यादरम्यान या रस्त्यावरून जाणाºया एखाद्या चारचाकी वाहनाच्या आवाजामुळे तो पळताच वाहनाखाली येऊन त्याच्या तोंडाला व मानेला मार लागल्यामुळे तो ठार झाला असावा, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
(वार्ताहर)