विखरण येथे धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:34 PM2018-01-30T12:34:09+5:302018-01-30T12:35:28+5:30
लोकप्रतिनिधी उपस्थित : ग्रामस्थही एकवटले
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दोंडाईचा येथे उभारण्यात येणाºया सौर उर्जा (पूर्वीचा औष्णिक) प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्राण पणाला लावून पाठपुरावा करणारे विखरण ता़ शिंदखेडा येथील वयोवृध्द शेतकरी धर्मा पाटील (८०) यांच्यावर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास साश्रृनयनांनी निरोप देण्यात आला़
सोमवार २२ रोजी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष घेतल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील जे़ जे़ रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु होते़ रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली़ त्यांचे पार्थिव सोमवारी रात्री विखरण ता़ शिंदखेडा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले़ यावेळी गावातील ग्रामस्थांसह नातेवाईक यांनी गर्दी केली होती़ मंगळवारी सकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली़ सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी त्यांचे पुत्र महेंद्र आणि नरेंद्र यांच्यासह राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, अतुल सोनवणे, हेमंत साळुंंखे, शानाभाऊ सोनवणे, ज्ञानेश्वर भामरे, छोटू पाटील, राजेंद्र देसले, कामराज निकम, नारायण पाटील, डी़ एस़ गिरासे, रामकृष्ण मोरे, माजी सरपंच विक्रम तायडे, डॉ़ रविंद्र देशमुख, विक्रम पाटील, माजी नगराध्यक्ष गुलाब सोनवणे, नितीन देसले, किशोर रंगराव पाटील, प्रमोद सिसोदे, राजेंद्र देवरे, राष्ट्रवादीचे दिलीप सोनवणे, विश्वनाथ पाटील, माजी सरपंच रामसिंग राजपूत, नरेंद्र गिरासे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़