बाधित मयतांवर केलेत अत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 05:36 PM2020-10-20T17:36:48+5:302020-10-20T17:37:50+5:30
सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव
चंद्रकांत सोनार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोना विषाणूचा प्रादुभार्व असल्याने अडीच महिन्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निणर्य शासनाने घेतला होता. याकाळात नागरीकांमध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्याबाबत समज-गैरसमज अधिक होते. अशावेळी कुटूंबातील व्यक्ती मयत झाल्यावर अनेकांनी अंतिम दर्शन व अत्यसंस्कार देखील नाकारला. अशा वेळी मनपाच्या आरोग्य विभागा्च्या मदतीने मयत कोरोना बाधीतांवर अत्यसंस्कार करण्याचे काम केले. आतापर्यत साडेचारशे बाधितांवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी दिली.
प्रश्न: अंत्यसंस्कार करण्यासाठी काय अडचणी आल्यात?
उत्तर: अंत्यसंस्कार करतांना विषाणू हवेतून पसार झाल्यावर कोरोनाची लागण होईल म्हणून देवपूर येथील स्मशान भूमित बाधित व्यक्तिीवर अंत्यसंस्कार करण्यास कर्मचार्यांना विरोध झाला. त्यामुळे साक्री येथे त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावा लागला. सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतल्याने खाजगी जागेवर अंत्यसंस्कार केले जात आहे.
प्रश्न : सर्व काही असतांना नातेवाईकांनी नकार दिला?
उत्तर: सुरवातीच्या काळात कोरोना विषाणूची मनात प्रचंड भिती होती. अशा काळात कुणाचा पती, कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा तर कुणाचे आई-वडीलांचा कोरोना काळात बाधित असल्याने मृत्यू झाला. व्यक्ती कायमचा जग सोडून गेल्याचे दु:ख ठेवून केवळ स्वता: ला कोरोनाची लागन होऊ नये. म्हणून अनेकांनी मयताचे अंतिम दर्शन नाकारून अंत्य संस्कार करण्यास नकार दिला. पद, पैसा, समाज, नातीगोती असतांना देखील पथकाकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याचे दु:ख वाटते.
प्रश्न : अंत्यसंस्कार करतांना काय काळजी घ्यावी
उत्तर: कुणाच्याही आयुष्यात असा प्रसंग येवू नये. मात्र आला किंवा मदतीची अपेक्षा व्यक्त केली तर नकारू नका, नक्की मदत करा, अंत्यसंस्कार करतांना पीपीई कीटचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा व घरी आल्यावर आंघोड करावी. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकतात.