गुटखा वाहतूक प्रकरणी कंपन्यांसह 12 जणांविरूध्द गुन्हा
By admin | Published: April 23, 2017 05:55 PM2017-04-23T17:55:11+5:302017-04-23T17:55:11+5:30
छुप्या पध्दतीने गुटखा, तंबाखू यांची वाहतूक केल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दोन कंपन्यांसह एकूण 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 23 - शहरातील चाळीसगाव चौफुलीवर दोन लक्झरी बसमधून पोलिसांनी 10 लाख 67 हजार 400 रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला होता़ याप्रकरणी चौकशीनंतर छुप्या पध्दतीने गुटखा, तंबाखू यांची वाहतूक केल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दोन कंपन्यांसह एकूण 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
इंदूरहून मुंबई व पुणे येथे जाणा:या संजय ट्रॅव्हल्सच्या दोन लक्झरी बस क्ऱ एमपी 09 एफए 5667 व क्ऱ एमपी 30 पी 9075 यांना पकडले होत़े दोन्ही बसेसमध्ये प्रवासी सीटखाली 4 लाख 89 हजार 600 रूपये किंमतीचा एम़डी़ गुटखा, 1 लाख 50 हजारांची व्ही- 1 तंबाखू, 3 लाख 11 हजार 360 रूपयांचा विमल पान मसाला, 85 हजार रूपयांचा इंडिया गोल्ड पाऊच हा चघळण्याचा पदार्थ असा एकूण 10 लाख 36 हजार 600 रूपये किंमतीचा गुटखा सापडला होता़ पोलिसांनी गुटखा व 30 लाख रूपये किंमतीच्या दोन बस जप्त करून बस चालकांनाही ताब्यात घेतले होत़े
महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असताना त्यांची लक्झरी बसमधून लपवून ठेवून वाहतूक केल्याप्रकरणी संजय ट्रॅव्हल्सचे मॅनेजर लक्ष्मण रामसहाय यादव (रा़ तिलक नगर, इंदूर), बस मालक अंकुर अनिलकुमार (रा़ नौलखा, इंदूर), अनिल संजय गुप्ता, हितेश संजय गुप्ता (रा़ 60, अश्विनी नगर, इंदूर), संदीप (पूर्ण नाव-गाव माहित नाही, रा़ इंदूर), रज्जाक भाई उर्फ मं़ रिजवान मं अब्दूल (रा़ घर नं़ 177, आझादनगर, इंदूर), मुकेश रामस्वरूप शिसोदिया (रा़ गुनाखापूरा, पोस्ट विष्णोदा, जि़ घौलपूर), अफसर हुसेन जुहिबानो रिझावी (रा़ 301 पार्ट मुंब्रा, ठाणे) कंपन्यांच्या मालकांविरूध्द भांदवि कलम 188, 272, 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े