अनधिकृत रोपवाटिका प्रश्नी अखेर गुन्हा; महाले, वर्मा यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:03 PM2019-07-10T17:03:44+5:302019-07-10T17:04:38+5:30

धुळे महापालिका : न्यायालयासमोर हजर करणार

The crime of unauthorized nursery is finally a crime; Mahale, Verma arrested | अनधिकृत रोपवाटिका प्रश्नी अखेर गुन्हा; महाले, वर्मा यांना अटक

dhule

Next
कमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील महावीर नगर येथील महापालिकेच्या जागेवर महाले प्रतिष्ठानच्या अनधिकृत रोपवाटीकेवर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाºयांशी हुज्जत घातल्याप्रकरणी बुधवारी सकाळी माजी नगसेवक सतीष महाले यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल करून महाले व उमेश वर्मा या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना दुपारी न्यायालयात नेण्यात आले आहे. महाले प्रतिष्ठानच्या रोपवाटीकेवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती़ सदरील रोपवाटीकेला कुलूप ठोकण्यासाठी मंगळवारी उपायुक्त शांताराम गोसावी यांच्यासह स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक रोपवाटीका स्थळी गेले. त्यावेळी माजी नगरसेविका मनिषा महाले यांनी अधिकाºयांशी हुज्जत घालत आधी घेऊन गेलेल्या रोपांचा हिशेब द्या, मगच रोपांना हात लावा. अन्यथा याद राखा, याच ठिकाणी आत्मदहन करेल, असा इशारा देऊन रोपवाटीकेला खाजगी कुलुप ठोकले होते़ त्यांनतर कारवाईसाठी गेलेले अधिकारी, कर्मचारी माघारी परतले होते़ दरम्यान मंगळवारी रात्री मनपाचे सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी चाळीसगावरोड पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार माजी नगरसेवक माजी नगरसेवक सतीष महाले, मनिषा महाले, उमेश वर्मा, नितीन भिकचंद वर्मा यांच्यासह १२ जणांवर भादंवि कलम ३५३, १४३, ३४१ अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान बुधवारी सकाळी सतीष महाले, उमेश वर्मा यांना अटक करण्यात आली. त्यांना दुपारी न्यायालयात नेण्यात आले.

Web Title: The crime of unauthorized nursery is finally a crime; Mahale, Verma arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.