जुने धुळे परिसरातील घरांवर तक्रारींमुळे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 06:37 PM2018-02-10T18:37:00+5:302018-02-10T18:38:17+5:30

अनिल गोटे : नदीकाठच्या रस्त्यांबाबत तक्रारी

Crisis due to complaints at houses in old Dhule area | जुने धुळे परिसरातील घरांवर तक्रारींमुळे संकट

जुने धुळे परिसरातील घरांवर तक्रारींमुळे संकट

Next
ठळक मुद्देजुने धुळे परिसरातील घरांवर संकटपांझरा काठच्या रस्त्यांबाबत सातत्याने तक्रारीशहरात नवीन विकास काम करणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात कुठल्याही विकास कामास विरोध होत असून सातत्याने तक्रारी होतात़ न्यायालयात धाव घेतली जाते़ दरम्यान, पांझरा नदीच्या दोन्ही बाजूस प्रस्तावित रस्त्यांच्या कामातही पूररेषेबाबतची तक्रार झाल्याने नदीपात्राची रूंदी १६५ मीटर करावी लागली असून त्यामुळे जुने धुळे परिसरातील घरांवर संकट आल्याचे पत्रक आमदार अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिले आहे़
शहरात कोणत्याही विकास कामास सुरूवात करताच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेणे हा उद्योग झाला आहे़ आता हरीत लवादकडे तक्रारी करून पांझरा नदीकाठी सुरू असलेली रस्त्यांची कामे थांबविण्यासाठी धडपड सुरू आहे़ ज्यांना जनतेने विविध पदे मिळवून दिली त्यांना जनतेसाठी एकही चांगले काम करता आलेले नाही़ त्यामुळे पांझरा काठी सुरू असलेल्या कामांमुळे त्यांची पोटदुखी वाढल्याचे गोटे यांनी म्हटले आहे़ तसेच पांझरा नदीपात्र शासन दरबारी काही ठिकाणी १६० व काही ठिकाणी १६५ मीटर रूंद असल्याचे शासकीय कागदांवर दिसून येते़ त्यामुळे नदीच्या दोन्ही काठांवरील रहिवाशांची समस्या लक्षात घेऊन एकविरा देवी मंदिराजवळील पुलाजवळ पात्राची रूंदी थोडी कमी गृहीत धरून जुने धुळे भागाकडील निवासी घरे वाचविण्याचा आपला प्रयत्न होता़ मात्र ज्यांनी चौपाटी पाडली त्याच लोकांनी नदीपात्राच्या रूंदीबद्दल तक्रारी केल्यामुळे तिथेही नदीपात्राची रूंदी १६५ मीटर करावी लागली़ त्यामुळे शहरात नवीन कामे करणे कठीण झाले असून जनतेने उपद्रवी लोकांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे आमदार गोटे यांनी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे़ 

Web Title: Crisis due to complaints at houses in old Dhule area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.