वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 07:57 PM2020-09-21T19:57:00+5:302020-09-21T19:57:37+5:30

हातातोंडाशी घास गेला वाया : ज्वारी, कपाशीचे पिके भुईसपाट, पंचनामे करून त्वरित भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Crop damage due to torrential rains | वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान

dhule

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीतून सावरत नाही, तोच शनिवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे पुन्हा एकदा खरिपाच्या पिकांना फटका बसून पिके भुईसपाट झालेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
कापडणे (ता. धुळे)
धुळे तालुक्यातील कापडणे गावासह कौठळ गावात १९ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजे नंतर विजांचा कडकडासह वादळी पाऊस झाला. यामुळे खखरीप हंगामातील कपाशी बाजरी मका सर्वत्र डोलदार पिके आडवे पडून जमीनदोस्त झालीत शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात वेळेच्या आधीच अर्थात एक जून रोजी धुळे तालुक्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर जून महिन्यात तब्बल पंधरा ते सोळा दिवस मध्यम जोरदार पाऊस झाला. आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात पावसाने मात्र जास्तच कहर केला आहे. सप्टेंबर महिन्यात देखील वादळीवाºयासह पाऊस झाला. ४ व ५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालो. यातून सावरत नाही, तोच १९ रोजी रात्री पुन्हा रात्री दोन ते तीन तास वादळ वाºयासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील सर्वत्र डोलदार काढणीवर आलेले शेती पिके अतिवृष्टीमुळे व वादळामुळे आडवी पडून जमीनदोस्त झालेली आहेत.
मोहाडी प्र डांगरी (ता.धुळे)
येथे शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे फायदा कमी नुकसानच जास्त झाले शेतीचा हंगाम ऐन भरात असतांना ,अचानक आलेल्या परतीच्या पावसाने मोहाडी सह परिसरातील गावांमध्येही शेतकº्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात वेचण्यासाठी तयार असलेल्या बागायती तसेच कोरडवाहू कापूस झाडावर ओला होऊन बोंडे अक्षरश: लोंबकळून जमीनदोस्त झाली. तसेच काढणीला आलेला भुईमुगाच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. पक्व झालेल्या शेंगांचे आता कोंब फुटूनवर येऊ लागतील. तिळीचे पीक पण पाण्यातच गेले आहे. आधीच मूग, उडीद आदी कडधान्य खराब झाले.
चारा पिकांचे प्रचंड नुकसानझाले आहे. बाजरी पण काळवंडली असून ज्वारीपण त्याच मार्गावर आहे.आता बरे होण्याच्या मार्गावर असलेले शेतशिवार रस्ते अजून एक महिना आता दुरुस्त होणार नाहीत.त्यामुळे झालेल्या नुकसानीचा त्वरित प्रशासनाने पंचनामे करून शेतकरी बांधवाना योग्य तो मोबदला मिळवून द्यावा.
दुसाणे (ता.साक्री)
साक्री तालुक्यातील दुसाणे व आजूबाजूच्या परिसरात १९ सप्टेंबर रोजी रात्री वादळी वाº्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यात शेतकº्यांच्या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. काही शेतकº्यांचा अगदी तोंडाशी आलेला घास जमीनदोस्त झाला. यात कांदा,कापूस, ज्वारी,बाजरी या पिकांचे खूप नुकसान झाले.बाजरी व ज्वारी काढणीची वेळ आली होती. परंतु अचानक आलेल्या पावसामुळे शेतकº्याची एकच तारांबळ उडाली. कापूस वेचणीच्या कामाला वेग आला होता, परंतु सर्व कापूस देखील गळून गेला. उर्वरित कापसाच्या झाडावरचे संपूर्ण बोंड वादळामुळे गळून पडली आहेत. तसेच फळबागेत पपई, अ‍ॅपल बोर , ऊस , केळी याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकº्याला तारणहार ठरणारे गवार पिकाच्या शेवटच्या तोडणी बाकी होत्या. ते पीक देखील पूर्णत: वाया गेले. तर या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस शनिवारी झाला. या पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता. वादळामुळे काही ठिकाणी विजेचे तार तुटून पडल्यामुळे परिसरात वीज पुरवठा खंडीत झालेला होता.
दरम्यान नुकसान झालेल्या पिकांचे महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Crop damage due to torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.