पीक विमा योजनेत केळी, द्राक्षासह आंबा मोसंबीचा केला समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:24 PM2020-10-07T12:24:02+5:302020-10-07T12:25:43+5:30
धुळे जिल्हा : कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक, लाभ घेण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा २०२०-२१ लागू करण्यात आली आहे. आंबिया बहारमध्ये धुळे जिल्हयासाठी केळी, आंबा, डाळींब, द्राक्ष या पिकांचा समावेश करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे.
कृषी अधीक्षक सोनवणे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, फळ पिकाचे प्रतिकूल हवामान घटकापासून नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकºयांचे होणारे नुकसान भरून निघावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारिक पीक विभागा योजना लागू करण्यात आलेली आहे.
धुळे जिल्ह्यासाठी द्राक्ष,केळी,मोसंबी आंबा,डाळींबा या पाच पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई, यांची निवड करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांंना बॅँकेत फळ पिक विमा भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यात द्राक्ष पिकासाठी १५ आॅक्टोबर, केळी व मोसंबीसाठी ३१ आॅक्टोबर, तर आंबा व डाळींब या फळ पिकासाठी ३१ डिसेंबर २०२० अंतिम मुदत राहील. ही योजना जे शेतकरी विविध वित्तीय संस्थाकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्यांची अधिसूचित फळ पिकासाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर आहे. तसेच कर्जदार, बिगर कर्जदार शेतकºयांना ही योजना ऐच्छिक आहे. शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.
मोसंबीचा प्रथमच समावेश
दोन वर्षांपूर्वी हवामान आधारित पीक विमा योजनेत लिंबू व पेरू या दोन फळांसह एकूण सहा फळांचा समावेश करण्यात आलेला होता. मात्र २०१९-२० मध्ये या लिंबू व पेरू या फळांना वगळले आले आहे. आता फक्त केळी, डाळींब, द्राक्ष व आंबा या पिकांसह मोसंबीचा प्रथमच योजनेत समावेश करण्यात आलेला आहे.