धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 21 हजार सभासदांना पीक कर्ज वाटप
By Admin | Published: June 28, 2017 05:41 PM2017-06-28T17:41:51+5:302017-06-28T17:41:51+5:30
धुळे-नंदुरबार जिल्हा बॅँकेचे 36 टक्के कर्ज वाटप. तातडीच्या वाटपास बॅँक तयार
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.28 - यंदाच्या खरीप हंगामाकरीता धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅँकेतर्फे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मिळून आतार्पयत 21 हजार 186 शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटप केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्जवाटपाची टक्के 36 टक्के एवढी आहे.
जिल्हा बॅँकेला यंदा पीक कर्ज वाटपाचे दोन्ही जिल्ह्यांसाठी मिळून 245 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात धुळे जिल्ह्यासाठी 125 कोटी व नंदुरबार जिल्ह्यासाठी 120 कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत आतार्पयत धुळे जिल्ह्यात 59 कोटी 31 लाख 49 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 12 हजार 898 शेतकरी सभासदांना या कर्जाचा लाभ झाला असून कर्जवाटपाची टक्केवारी 47 टक्के एवढी आहे. नंदुरबार जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत आतार्पयत 28 कोटी 11 लाख 19 हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी 23 टक्के एवढी आहे. 7 हजार 231 शेतकरी सभासदांना या कर्जाचा लाभ झाला आहे.