पाण्याअभावी पिके करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:48 PM2019-03-19T22:48:06+5:302019-03-19T22:49:20+5:30
कापडणे : जलपातळी दिवसेंदिवस खोल-खोल, गुरांच्या पाणी, चाऱ्याचा प्रश्न बिकट
कापडणे : पाणी नसल्यामुळे शेतातील मक्यासह चारावर्गीय पिके करपत आहेत. चाराटंचाईमुळे पशुधन कसे वाचवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात. तसेच चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकºयांनी कुपनलिका व विहिरीतील जलपातळीचा अंदाज घेऊन उन्हाळी हंगामात पशुधन जीवंत ठेवण्यासाठी चारावर्गीय पिकांचा पेरा केला. मात्र, विहिरीच्या व कुपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होताना दिसत आहे.
काही शेतकºयांनी पाण्याचे नियोजन करून भाकड व दुधाळ जनावरांसाठी चारा उत्पादन करण्यासाठी मका पिकाची थोड्याफार प्रमाणात लागवड केलेली आहे. मात्र, ऊन्हाचा तडाखा जास्त बसत असल्याने विहिरींच्या जलपातळीत जलद गतीने घट होत आहे. विहिरींची जलपातळी आटल्याने विविध शिवारातील पिके करपून गेली आहेत. यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
कापडणे येथील जाणकार शेतकºयांच्या मते यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतकºयांपुढे पशुधन वाचविण्याचे आव्हान उभे आहे. पाणी व चाराटंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सलग तीन ते चार वर्षांपासून सातत्याने पर्जन्यमान कमी होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शिवारातील पिके व गुरांसाठी पाण्याची उपलब्धता कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत.
पाणी व चाराटंचाईमुळे गुरांची विक्री
सद्यस्थितीतच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक होणार आहे. सध्या शेतकºयांकडे साठविलेला चारा संपत आल्याने शेतकºयांनी आता भाकड जनावरांसोबत दुधाळ जनावरे देखील अत्यल्प दरात विक्रीला काढली आहेत.
पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने ताबडतोब उपाययोजना करावी. तसेच चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी कापडणे येथील शेतकरी जयवंत बोरसे, राजेंद्र बोरसे, सुनील पवार, नथू माळी, देविदास खलाणे, अनिल माळी, नारायण माळी, मच्छिंद्र बोरसे, पितांबर पाटील, उज्वल बोरसे, अरुण पाटील, अरविंद पाटील, भिला बोरसे, भटू बोरसे, पंकज बोरसे आदींनी केली आहे.