आमदार कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष काशिराम पावरा यांच्या स्वागतासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:37 PM2019-10-25T13:37:18+5:302019-10-25T13:37:32+5:30
फटाक्याच्या आतिषबाजीत जल्लोषात साजरा
शिरपूर : मतमोजणीनंतर महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या विजयाचा जल्लोष येथील आमदार कार्यालयातील प्रांगणात गुलाल उधळत फटाक्याच्या आतिषबाजीत जल्लोषात साजरा करण्यात आला़
रिमझिम पावसात डीजेच्या वाद्यावर अनेकांची पाऊले थरकलीत़ जस-जसे मताधिक्य वाढत गेले तसे रिमझिम पावसात देखील आनंदोत्सव साजरा झाला़ मतमोजणीनंतर अनेकांनी पटेल बंधूची भेट घेतली़ आमदार काशिराम पावरा यांचे गुलाल उधळून, पुष्पमालाच्या व फटक्याचे आतिषबाजीत कधी नव्हे असे अपूर्व स्वागत जनसमुदायाने केले़ यावेळी केवळ आदिवासीच नाही तर मतदार संघातील मोठ्या संख्येने नागरीक निकाल ऐकण्यासाठी जमले होते़ यावेळी माजी आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, भूपेशभाई पटेल, तपनभाई पटेल, चिंतनभाई पटेल यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली़ यावेळी डॉ़ तुषार रंधे, बबन चौधरी, राहुल रंधे, हेमंत पाटील, हिंमत महाजन, राजु टेलर, भरतसिंग राजपूत, मनोज धनगर, देवेंद्र पाटील, प्रभाकर चव्हाण, राजगोपाल भंडारी, प्रसन्न जैन, नरेंद्रसिंग सिसोदिया, सुभाष कुलकर्णी, शैलेंद्र अग्रवाल, कैलासचंद्र अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, गोपाल भंडारी, यशवंत बाविस्कर, राधेश्याम शर्मा तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावेळी सायंकाळी उशिरापर्यंत जोश कायम होता़
शिरपूर तालुक्याचे ८ वे आमदार ़़़
स्वातंत्र्यानंतर पहिली विधानसभा निवडणूक सन १९५२ साली होवून हा मतदार संघ खुला गटाकरीता आरक्षित होता़ त्यावेळी पहिले आमदार होण्याचा बहुमान काँग्रेसचे ग़द़माळी यांना मिळाला होता़ त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून कर्मवीर व्यंकटराव रणधीर, काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव पाटील, जनता पक्षाकडून प्रल्हादराव पाटील, काँग्रेसकडून इंद्रसिंग राजपूत, जनता पक्षाकडून संभाजीराव पाटील, काँग्रेस पक्षाकडून अमरिशभाई पटेल, काँग्रेसकडून काशिराम पावरा तर आता भाजपाकडून काशिराम पावरा हे निवडून आले आहेत़ स्वातंत्र्यानंतर या ६७ वर्षात ८ वे आमदार म्हणून काशिराम पावरा आहेत़