जिल्ह्यात केक कापून प्रभू येशूंच्या जन्माचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 10:22 PM2019-12-25T22:22:02+5:302019-12-25T22:22:44+5:30

ख्रिसमस नाताळ : चर्चमध्ये रोषणाई, प्रार्थना

Cutting the cake in the district | जिल्ह्यात केक कापून प्रभू येशूंच्या जन्माचे स्वागत

Dhule

googlenewsNext


धुळे : शहरासह जिल्हाभरात ख्रिसमस नाताळ सण विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली.
किसान विद्याप्रसारक संस्था
शिरपूर- येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित व्यंकटराव रणधीर सी.बी.एस.ई. स्कूलमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत विविध मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आले़ शालेय विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस, ख्रिसमस फूड फेयर व पालकांसाठी विशेष कुकिंग विदाउट फायर स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी जि़प़ सदस्या सीमा रंधे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात परीचा वेश परिधान केलेली चिमुकली व सांताक्लॉज बनलेला विद्यार्थी यांच्या नृत्याने झाली़ त्यानंतर फनफेयर व स्पर्धेस सुरुवात झाली. स्पर्धेअंतर्गत पालकांनी सुशोभित केलेल्या स्टॉलमध्ये विविध चविष्ट पदार्थ बनवून आणले होते. प्राचार्या प्रसन्ना मोहन यांनी स्पर्धेच्या परिक्षक म्हणून काम पाहिले. कुकिंग विदाउट फायर स्पर्धेत प्रथम बक्षीस चारुलता पाटील, द्वितीय दीपा अग्रवाल व तृतीय बक्षीस दिपाली देशमुख यांनी पटकाविले. तसेच उत्कृष्ठ पदार्थासाठी सरोज भालकार, उत्कृष्ठ स्टॉलसाठी मीनल सूर्यवंशी यांना पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट वेशभूषेसाठी यश पाटील व नव्या पवार यांची निवड झाली. तसेच ख्रिसमस स्टार म्हणून नर्सरीमधील नेत्रा सागर पवार हिची निवड झाली. बक्षीस वितरण सीमा रंधे व प्राचार्या प्रसन्ना मोहन यांच्याहस्ते करण्यात आले़ यावेळी शाळेचे समन्वयक अमोल सावळे, सागर वाघ, शालेय कल्चरल क्लबच्या शीतल माहेश्वरी उपस्थित होते.
आर.सी. पटेल शाळा
शिरपूर- येथील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेत साने गुरुजी जयंती व नाताळ सण साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.टी. भोई होते. प्रमुख पाहुणे सुवर्णा दोरीक होत्या. एस.के. भील, भारती मराठे यांनी मार्गदर्शन केले़ सांताक्लॉजची वेशभूषा किर्तीराज कोळी याने केली. सुत्रसंचालन भारती मराठे यांनी केले. आभार अलका गोराणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी छाया वाडीले, हर्षदा भावसार, राकेश शिरसाठ, क्रीष्णा पावरा, प्रविण पाटील, अरुण नकवाल यांचे सहकार्य लाभले.
सुभाष कॉलनी शाळेत उपक्रम
शिरपूर- शहरातील सुभाष कॉलनीतील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेत ख्र्रिसमस नाताळ साजरा करण्यात आला़ चिमुकल्या सांताक्लॉजनी लक्ष वेधून घेतले. रमाकांत तवर यांनी ख्रिसमस नाताळ सणाविषयी माहिती दिली. प्रणव भावसार या विद्यार्थ्याने सांताक्लॉजची वेशभूषा करून विद्यार्थ्यांना चॉकलेट व भेटवस्तू दिल्या. मुख्याध्यापक महेंद्रसिंग परदेशी व दीपिका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. इयत्ता नर्सरी व बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर केक कापण्यात आला. कार्यक्रमासाठी उज्वला दायमा, श्रद्धा भावसार यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Cutting the cake in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे