अक्कलपाडा प्रकल्पातून अखेर आवर्तन सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:18 PM2018-05-07T22:18:43+5:302018-05-07T22:18:43+5:30

धुळे प्र.जिल्हाधिकाºयांचे आदेश : ‘पाटबंधारे’ची कार्यवाही, थकबाकीची जबाबदारी ‘ग्रामीण पाणीपुरवठा’वर 

The cycle is complete after the Akkalpada project | अक्कलपाडा प्रकल्पातून अखेर आवर्तन सुटले

अक्कलपाडा प्रकल्पातून अखेर आवर्तन सुटले

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात १३ गावांना टॅँकरद्वारे पाणी, नदीकाठच्या गावांना तीव्र पाणीटंचाईथकबाकीचा तिढ्यामुळे आवर्तन लांबले आवर्तन सुटल्याने ग्रामीण भागाला दिलासा 



लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : टंचाईच्या झळा तीव्र झाल्यानंतर सातत्याने मागणी होत असल्याने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून अखेर सोमवारी दुपारी १२ वाजता पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. रविवारी प्र.जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांनी याबाबत पाटबंधारे विभागाला आदेश दिले होते. त्यावर लगेच कार्यवाही करण्यात आली. ग्रा.पं.कडील पाणीपट्टी थकबाकी वसूल करून ती पाटबंधारे विभागास देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर टाकण्यात आली आहे. 
पाटबंधारे विभागाने दुसºया आवर्तनासाठी एकूण थकबाकीच्या किमान ५० टक्के रक्कम भरण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पत्र पाठवून केली होती. त्यावर थकबाकी वसुली कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली असून चालू मे महिन्याअखेर किमान ५० टक्के थकबाकी भरण्याची ग्वाही देऊन टंचाई दूर करण्यासाठी लगेच आवर्तन सोडण्याची विनंती पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाला पत्र लिहून केली होती. तेच पत्र प्र.जिल्हाधिका-यांना देऊन टंचाई निवारणासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला आदेश द्यावे, अशी विनंती करण्यात आली होती. त्या नुसार डॉ.नंदकुमार बेडसे यांनी पाटबंधारे विभागाला नदीपात्रातील जिल्ह्यातील शेवटच्या गावापर्यंत पोहचेल, या बेताने पाणी सोडण्याचे आदेश दिले. ते पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचणे अपेक्षित आहे. 
पाणी पोहचविण्याची जबाबदारी अधिकाºयांवर 
सुटलेले आवर्तन धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यांच्या शेवटच्या गावांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संयुक्तरीत्या संबंधित तहसीलदार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या पं.स. उपअभियंता, वीज महावितरण कंपनीचे उपअभियंता, पोलीस निरीक्षक, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता, तलाठी व ग्रामसेवक यांची राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी-यांनी त्यांच्या स्तरावर अधिकारी, कर्मचाºयांचे पथक स्थापन करावे. या पथकाने अवैधरीत्या पाणी अडविणे व अवैधरीत्या उपसा करणा-यांवर कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.
 नदीपात्रातील १९ कोल्हापुरी बंधा-यांच्या फळ्या काढण्याची जबाबदारी त्या-त्या विभागाची राहणार आहे. यात हलगर्जीपणा केल्यास संबंधिताविरूद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही प्र.जिल्हाधिकाºयांनी आदेशात दिला आहे. 
प्रकल्पातून सोडलेल्या पाणीसाठ्याची पाणीपट्टीची रक्कम लोकसंख्येनुसार ग्रा.पं.ना विभागून देत ती रक्कम वसूल करून पाटबंधारे विभागास देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची राहील, असेही नमूद केले आहे. 
जिल्ह्यात टंचाईची धग चांगलीच वाढल्याने टॅँकरची संख्या वाढत चालली आहे. सध्या तापमानाचा पारा ४३-४४ अंशावर स्थिरावला असून पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे टॅँकरसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव वाढू लागले आहेत.मार्चच्या दुसºया आठवड्यापर्यंत केवळ शिंदखेडा तालुक्यातील ९ गावांना ८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यानंतर मात्र तापमानात वाढ होत गेल्याने टॅँकरची मागणी व संख्याही वाढत गेली. सद्यस्थितीत १३ गावांना १३ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 
शिंदखेडा तालुक्यातील ९ गावांना ८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात पथारे, भडणे, वरुळ घुसरे, चुडाणे, सोनशेलू, विटाई, कामपूर, दत्ताणे व मेलाणे या  गावांचा समावेश आहे. दत्ताणे व मेलाणे या दोन गावांना एका टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. 
तर धुळे तालुक्यातील ४ गावांना ५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात फागणे, आंबोडे, मांडळ व मोघण या गावांचा समावेश आहे. मांडळ गावासाठी २७ एप्रिल रोजी तर मोघणसाठी ३ मे रोजी टॅँकर सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. फागणे या मोठ्या गावासाठी एकाचवेळी दोन टॅँकर सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर तेथे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 
आवर्तन सोडण्याबाबत प्र.जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांचे आदेश रविवारी प्राप्त झाले. सोमवारी दुपारी १२ वाजता आवर्तन सोडून आदेशाची अंमलबजावणी केली, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के.टी. सूर्यवंशी यांनी दिली. 

 

Web Title: The cycle is complete after the Akkalpada project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.