शिक्षकाची प्रबोधनपर सायकल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:06 PM2019-12-29T23:06:02+5:302019-12-29T23:06:22+5:30

जैताणे : प्राथमिक शिक्षक सुभाष पगारे यांचा उपक्रम

Cycle tour of teacher's enlightenment | शिक्षकाची प्रबोधनपर सायकल यात्रा

शिक्षकाची प्रबोधनपर सायकल यात्रा

Next

जैताणे : शिक्षण, आरोग्य, शेती या विषयावर ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी आणि प्राथमिक शिक्षकांच्या भेटीसाठी निजामपूर येथील प्राथमिक शिक्षक सुभाष भुराजी पगारे यांनी धुळे ते नंदुरबार जिल्ह्यात प्रबोधनपर सायकल यात्रा काढली.
साक्री तालुक्यातील वासखेडी जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षक आणि राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सुभाष भुराजी पगारे यांनी २१ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता निजामपूर जवळील खुडाणे चौफुली सायकल यात्रेला सुरुवात केली. सायकलवरुन नंदुरबार शहर आणि रस्त्यात येणारी सर्व गावे करीत दोंडाईचा आणि तेथून चिमठाणे मार्गे धुळे तालुक्यातील सोनगीर, नगाव येथून धुळे शहर आणि तेथून रस्त्यात येणाऱ्या गावांना भेटी देत ते २३ डिसेंबरला पुन्हा निजामपूरला पोहचून सायकल यात्रेचा समारोप केला. समारोप प्रसंगी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे, शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी कैलास दाभाडे, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश बच्छाव, महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पावबा बच्छाव, आदर्श शिक्षक रामचंद्र भलकारे, माजी सरपंच संजय खैरनार, सुकाजी चव्हाण, दौलत माळी, शानाभाऊ जाधव, प्राथमिक शिक्षक नितीन पाटील, सुनिल जाधव, दिपक मोरे, केवबा बच्छाव, विजय न्याहळदे, जयसिंग भुईटे, योगेश हालोर, विजय गावित, प्रा.रविंद्र सुर्यवंशी, मल्हार व्यायाम शाळेचे अध्यक्ष दशरथ शेलार, किरण जाधव, गोकुळ पगारे, त्र्यंबक भलकारे, बापू पगारे यांनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: Cycle tour of teacher's enlightenment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे