६६ घरकुल धारकांना धनादेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:06 PM2020-01-01T22:06:26+5:302020-01-01T22:06:40+5:30

शिंदखेडा नगर पंचायत : पहिला हप्त्याचे झाले वाटप

 देश Distribute checks to house holders | ६६ घरकुल धारकांना धनादेश वाटप

Dhule

Next


शिंदखेडा : येथील नगर पंचायत मार्फत ६६ घरकुल धारकांना धनादेशांचे वितरण नुकतेच करण्यात आले.
नगर पंचायत वाचनालय सभागृहामध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा रजनी वानखेडे यांच्यासह गटनेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला बारकू माळी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, युवराज माळी, नगरसेवक आर.एच. भामरे, नगरसेवक किसन सकट, चेतन परमार, विनोद पाटील, अर्जुन भिल उपस्थित होते.
या कार्यक्रमात ६६ घरकुल धारकांना प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले.
तसेच प्रत्येकी दोन लाख ५० हजार रुपये मिळणार आहे. यातील वीस हजारांचा प्रथम हप्ता या कार्यक्रमात देण्यात आला. घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या रक्कम उर्वरित बांधकाम झाल्यावर दुसरा हप्ता रुपये ४० हजार नंतर जसजसे बांधकाम पूर्ण होईल तसतसे पैसे पाठवण्यात येणार आहेत.
धनादेशाच्या वितरण केल्यामुळे घरकुल धारकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. या कार्यक्रमासाठी नगरपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गावातील लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  देश Distribute checks to house holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे