दहिवेलच्या तरुणाची धुळ्यात गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:30 PM2018-07-26T13:30:48+5:302018-07-26T13:32:24+5:30

देवपुरातील घटना : पश्चिम देवपूरला अकस्मात मृत्यूची नोंद

Dahiwal youth commits suicide in Dhule | दहिवेलच्या तरुणाची धुळ्यात गळफास घेऊन आत्महत्या

दहिवेलच्या तरुणाची धुळ्यात गळफास घेऊन आत्महत्या

Next
ठळक मुद्देदेवपुरात तरुणाने घेतला गळफासप्रेमप्रकरणातून झाल्यास अंदाजपश्चिम देवपूर पोलिसात नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री तालुक्यातील दहिवेल येथील तरुणाने धुळे शहरातील देवपूर भागातील उन्नती कॉलनीच्या उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारालाच गळफास घेतला़ ही घटना गुरुवारी पहाटे उजेडात आली़ पश्चिम देवपूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते़ दरम्यान, प्रेम प्रकरणातून त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़ 
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील संकेत सुरेश गवळी (१८) याने जयहिंद संस्थेमध्ये १२ विज्ञानचे शिक्षण पूर्ण केले होते़ त्यानंतर पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी तो धुळ्यात आला होता़ त्याच्या सोबत त्याचे वडील आणि अन्य होते़ प्रवेश प्रक्रियेचे काम आटोपल्यानंतर ते सर्व साक्री तालुक्यातील दहिवेल गावाकडे जाण्यासाठी निघाले होते़ बुधवारी रात्री धुळ्यालगत काही खाण्यासाठी ते थांबले़ सर्वांची नजर चुकवून संकेत तेथून पसार झाला़ तो कुठे गेला याची शोधाशोध सुरु झाली़ त्याच्या मित्राशी संपर्क साधण्यात आला़ कालांतराने त्याने देवपुरातील नकाणे रोडवरील शिवप्रताप कॉलनीजवळ उन्नती कॉलनीच्या गार्डनच्या प्रवेशद्वाराला त्याने गळफास घेतल्याची माहिती त्याच्या वडिलांना मिळाली़ ही घटना पहाटे घडली़ पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने दाखल झाले़ त्याला वैद्यकीय उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ तपासणी करुन त्याला डॉक्टरांनी मयत घोषीत केले़ त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले़ दरम्यान, हा प्रकार प्रेमप्रकरणातून झाल्याचा कयास लावला जात आहे़ या वृत्ताला संकेतचे वडील सुरेश गवळी यांनी देखील दुजोरा दिला आहे़ सुरेश गवळी हे दहिवेल येथे माध्यमिक शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत़ संकेतच्या पश्चात आई, वडील आणि १ बहिण असा परिवार आहे़ संकेतच्या बहिणीचे लग्न झाले असून त्याला एक भाची देखील आहे़ पश्चिम देवपूर पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत़

Web Title: Dahiwal youth commits suicide in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.