दररोज ७० हजार लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 11:53 AM2017-10-11T11:53:39+5:302017-10-11T11:55:53+5:30

गळतीच्या दुरूस्तीसाठी दोन दिवस जलवाहिनी बंद

Daily loss of 70 thousand liters of water | दररोज ७० हजार लिटर पाण्याची नासाडी

दररोज ७० हजार लिटर पाण्याची नासाडी

Next
ठळक मुद्देगळत्यांमधून दररोज सरासरी १४ टँकर पाण्याची नासाडी २५ वर्षांचा कालावधी उलटूनही जलवाहिनी सुस्थितीत तापी जलवाहिनीवरून ६० टक्के शहराला पाणीपुरवठा होतो़ 


आॅनलाईन लोकमत
धुळे  : महापालिकेच्या तापी जलवाहिनीला लागलेल्या गळतींमधून दररोज सरासरी १४ टँकर अर्थात ७० हजार ते १ लाख लिटर पाण्याची नासाडी होत असून हे प्रमाण एकूण पाणीपुरवठ्याच्या १ टक्क्यापेक्षाही कमी असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली़ गळत्यांच्या दुरूस्तीसाठी बुधवार व गुरूवार असे दोन दिवस जलवाहिनी बंद ठेवली जाणार आहे़ 
महापालिकेने अमृत योजनेंतर्गत अक्कलपाडा ते हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी प्रस्तावित केली असून या जलवाहिनी साठी काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती़ या बैठकीत तापी जलवाहिनीतून होणाºया पाणी नासाडीचा विषय चर्चिला गेला़ त्यावेळी तापी जलवाहिनीला लागलेल्या गळत्यांतून दररोज नेमक्या किती पाण्याची नासाडी होते, याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाºयांसह मनपा अधिकाºयांनी पाहणी केली़ तापी जलवाहिनीला लागलेल्या गळत्यांमधून दररोज सरासरी १४ टँकर पाण्याची नासाडी होत असल्याचे समोर आले आहे़ अर्थात हे प्रमाण जलवाहिनीवरून होणाºया एकूण पाणीपुरवठ्याच्या १ टक्का आहे़ त्यामुळे जवळपास २५ वर्षांचा कालावधी उलटूनही जलवाहिनी सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ तापी जलवाहिनी अस्तित्वात आल्यापासून जलवाहिनीच्या देखभाल व दुरूस्तीच्या कामांवर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला आहे़ तापी जलवाहिनी १९९१ पासून कार्यान्वित  असून या जलवाहिनीवरून ६० टक्के शहराला पाणीपुरवठा होतो़ 



 

Web Title: Daily loss of 70 thousand liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.