धुळ्यात राजकुमार सूर्यवंशी यांना दामा भूषण तर अरूण साळुंके यांना दामा मित्र पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 09:42 PM2018-04-15T21:42:40+5:302018-04-15T21:42:40+5:30

इंडियन मेडीकल असोसिएशन व डॉ. आंबेडकर मेडीकोज असोसिएशन यांच्या विद्यमाने कार्यक्रम

Dama Bhushan to Rajkumar Suryavanshi in Dhule and Dama Mitra Award for Arun Salunkhe | धुळ्यात राजकुमार सूर्यवंशी यांना दामा भूषण तर अरूण साळुंके यांना दामा मित्र पुरस्कार प्रदान

धुळ्यात राजकुमार सूर्यवंशी यांना दामा भूषण तर अरूण साळुंके यांना दामा मित्र पुरस्कार प्रदान

Next
ठळक मुद्देडॉ. आंबेडकर मेडिको असोसिएशनतर्फे दरवर्षी दामाकॉन पुरस्कार हा वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाºया मान्यवरांना दिला जातो. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सूत्रसंचालन डॉ. अभिनय दरवडे यांनी केले.यशस्वीतेसाठी जयप्रकाश पुपलवाड, श्रद्धा मोरे, विक्रम शिंदे, निकीता मोहीत, वैष्णवी जाधव, मोहिनी मोरे, कार्तिक खेडकर, पवन खरात, पूजा नांगरे, निखिल वानखेडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  इंडियन मेडीकल असोसिएशन, धुळे व डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दामाकॉन वैद्यकीय शैक्षणिक परिषद व दामाकॉन २०१८’ या पुरस्काराचे वितरण रविवारी जेलरोडवरील आयएमए सभागृहात झाले. या कार्यक्रमात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांना ‘दामा भूषण’ तर ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ तथा जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन डॉ. अरूण साळुंके यांना ‘दामा मित्र’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन  झाले.  या वेळी भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. अरूण मोरे, आयएमए धुळे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, कार्याध्यक्ष डॉ. नीता हटकर, सचिव डॉ. पराग उपकारे, दामा अध्यक्ष डॉ. दीपक शेजवळ, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप सोनवणे, सचिव वैभव खिल्लारे आदी उपस्थित  होते. 

विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची तयारी ठेवा
कार्यक्रमात प्रा. बाबा हातेकर यांनी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विद्यार्थी’ या विषयावर मार्गदर्शन केले.  
बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करीत विविध पदव्या संपादित केल्या. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आता सर्व सोयी, सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वी अशा सुविधा नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कष्ट घेत नावलौकीक मिळविले. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला. याप्रसंगी आयएमतर्फे घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच  आयएमए शाखेत कर्मचाºयांनाही गौरविण्यात आले. 
 

Web Title: Dama Bhushan to Rajkumar Suryavanshi in Dhule and Dama Mitra Award for Arun Salunkhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे