वादळामुळे बोरीच्या बागेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 10:18 PM2020-09-12T22:18:45+5:302020-09-12T22:19:08+5:30

कापडणे : सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज, भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Damage to sack garden due to storm | वादळामुळे बोरीच्या बागेचे नुकसान

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांसह विविध फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कापडणे येथील शेतकºयाची बोरांची बागेचेही नुकसान झाले आहे.
कापडणे येथील शेतकरी तुकाराम राजाराम पाटील, चंद्रकांत तुकाराम पवार या शेतकºयांची तीन एकर क्षेत्रावर बोरांची फळबाग आहे. ४ सप्टेंबर रोजी झालेल्या वादळामुळे बोरांच्या झाडांवरील संपूर्ण फुलोरा जमिनीवर गळून तर पडलाच पण यासोबतच शेतातील बहुतांशी बोरांची झाडे उन्मळून पडली. या शेतकºयांनी अ‍ॅपल बोराची शेतात लागवड केलेली आहे. हे झाड अगदी नाजूक असते. औषध फवारणी करण्यापर्यंत सर्वत्र खर्च जवळपास एक लाख रुपयाचा खर्च झालेला आहे. कोरोनाच्या महामारीची मनात भीती असतानाही सदर बोर फळ पिकावर पैसा मोठा खर्च झालेला आहे. कोरोनामुळे उत्पादित मालाला बाजार मार्केट मिळते की नाही अशी भीतीही असताना देखील खर्च करावा लागला. अशातच ४ सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी पावसामुळे येथील शेतातील बरेचशे बोरांची झाडांच्या फांद्या तुटल्या. काही झाडे उन्मळून पडली. यामुळे कापडणे गावातील सर्व फळ पिके घेणाºया शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकसान भरपाई द्यावी
नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांसह फळपिकांचे व बोर पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी. तसेच बोर फळपीकाला देखील विमा संरक्षण कवच लागू करावे अशी मागणी चंद्रकांत पवार, कापडणे यांनी केली आहे.

Web Title: Damage to sack garden due to storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.