वीजतारांचा धोका, चालढकल रोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:42 PM2019-04-24T22:42:23+5:302019-04-24T22:43:06+5:30

दुर्लक्ष : भूमिगत वीज तारांसह एलईडींवरही भर देण्याची गरज

The danger of electricity, stop the movement! | वीजतारांचा धोका, चालढकल रोखा!

dhule

Next

धुळे : शहरात प्रत्येक प्रमुख चौक व परिसरात वीज तारांचे धोकादायक जाळे पसरत चालले आहे़ त्यामुळे वीज तारांचा धोका रोखण्यासाठी त्या भूमिगत करणे आवश्यक असून त्यासाठी सुरू असलेली चालढकल रोखणे आवश्यक आहे़ दोन वर्षांपूर्वी भूमिगत तारांसाठी शहरातील जीर्ण वीज तारांच्या सर्वेक्षण करण्यात आले होते़ मात्र उद्याप प्रश्न मार्गी लागू शकलेला नाही़
अपघातांची मालिका
वीज तारा, खांब यामुळे अनेक अपघात झाले आहेत़ अपघाताच्या घटना रोखण्यासाठी जीर्ण वीज तारा बदलणे, रस्त्यातील धोकादायक विद्युत खांब हटविणे, प्रमुख चौकातील वीज तारांचे जाळे भूमिगत करणे ही कामे तातडीने करणे गरज असतांना सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे़
एलईडी पथदिवे आवश्यक
शहरासह जिल्ह्यात एलईडी पथदिव्यांचा वापर वाढविण्यासाठी महावितरणने योजना राबविली होती़ या योजनेंतर्गत एलईडी बल्बची स्वस्तात विक्रीही करण्यात आली़ पण काही दिवसांतच ही योजनाही कोलमडल्याचे दिसून आले आहे़ त्यामुळे शहरातील एलईडींचा वापर वाढावा, वीज गळती व वीज चोरीचे प्रमाण कमी व्हावे, वीज बिलांची वसुली सुरळीत व्हावी यासाठी एलईडी पथदिव्यांचा वापर वाढविणे गरजेचे आहे़ तसेच शहरातील, महामार्गांवरील पथदिवे एलईडी करण्यासाठीही योग्य कार्यवाही होणे आवश्यक आहे़ तसेच सौर ऊर्जेवरही भर देण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने योजना राबविणे गरजेचे आहे़ शहरातील धोकादायक वीजतारा, उघड्या डीपी, बंद पथदिवे यांचे सर्वेक्षण करून नवीन साहित्य व सुरक्षित ठिकाणी निर्माण करणे आवश्यक आहे़ आधीच अरूंद गल्ल्यांमध्ये असलेल्या वीजतारा व खांबांमुळे वाहतुकीला अडथळा येतो़
अधिकारी, कर्मचारी असहकार्य
शहरातील जीर्ण विद्यृत तारांमुळे पावसाळ्यात विजपुरवठा अचानक खंडीत होता़े त्यामुळे तांत्रिक बिघाड काढण्यासाठी विजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते़ त्यामुळे रात्रभर विजपुरवठा खंडित होतो़ मात्र अधिकारी व कर्मचारी फोन बंद करून ठेवत असल्याने नागरिकांना नेमकी माहिती मिळू शकत नाही़
सहा लाख नागरिक वेठीस
जीर्ण तारां, उघड्यावरील विद्यृत डिप्या,वाकलेले खांब, लोमकळणाºया तारांमुळे विजेचा धक्का लागुन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ विद्यृत तारा बदलण्याबाबत मागणी करून देखील उद्याप प्रश्न सुटू शकला नाही़ त्यामुळे शहरातील सहा लाख नागरिकांना वेठीस धरले जात आहे़

Web Title: The danger of electricity, stop the movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे