दरवाढीच्या माहितीअभावी सामान्यांचा गोंधळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2017 11:18 PM2017-01-09T23:18:00+5:302017-01-09T23:18:00+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालय : सर्वच बाबतीत 4 ते 5 पटीने वाढ, नागरिकांची नाराजी
धुळे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित असलेल्या कामकाजातील शुल्कात घशघशीत वाढ करण्यात आली आह़े विशेष म्हणजे याबाबतीत कोणत्याही प्रकारची माहिती येथे येणा:या नागरिकांना नसल्याने संभ्रम निर्माण झाला आह़े माहितीचा अभाव प्रकर्षाने जाणवत असल्यामुळे नाराजीचा सूर सोमवारी उमटला़ ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून ही विदारकता समोर आली़
सर्वच बाबतीत दरवाढ
वाहन परवाना आणि आनुषंगिक अशा 28 प्रकारच्या विविध कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा संबंध प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी येतो़ मालेगाव रोडवरील शहराच्या शेवटच्या भागात हे कार्यालय असल्याने भरपूर वेळ काढून नागरिकांना याठिकाणी यावे लागत़े आल्यानंतर काम मार्गी लागेल याची कोणतीही शाश्वती नाही़ सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असे दर यापूर्वी होत़े पण, अचानक दरवाढ झाल्याने याचा फटका सहन करावा लागतो आह़े
माहिती फलकच नाही
या विभागाशी संबंधित अशा विविध करप्रणालीत 6 जानेवारीपासून वाढ करण्यात आली आह़े याची माहिती सामान्य नागरिकांना झाली पाहिजे, यासाठी फलक लावण्याची आवश्यकता असताना मात्र कोणत्याही प्रकारचा फलक नसल्याने संभ्रम निर्माण होत आह़े
गोंधळाची स्थिती
नवीन आलेले दरफलक नाही, कोणी माहिती देत नाही, उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात, फिरवा-फिरव केली जाते असे विविध आरोप यावेळी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरीकांकडून करण्यात आल़े दरवाढ झाली असल्याने माहिती मिळावी, कामे अधिक गतीने व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त झाली़
मला ऑनलाइन तारीख देण्यात आली आह़े पण, अद्याप माङो काम झालेले नाही़ प्रत्येक बाबतीत दरवाढ झाली असल्याची माहिती नाही़ त्याचा फटका आता सहन करावा लागणार आह़े
- योगेश पाटील, नावरा-नावरी, ता़ धुळे
आरटीओ ऑफिसला दैनंदिन व्यवसाय सोडून यावे लागत़े तरीही काम मार्गी लागेल याची शाश्वती नाही़ अचानक झालेली ही करवाढीची माहिती नाही़ पाचपट वाढ झाली असल्याने नाराज आह़े
- राकेश माळी, धुळे