जिल्ह्यात डेंग्यूसह मलेरियाचाही कहर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:08 PM2017-10-06T14:08:55+5:302017-10-06T14:09:54+5:30

डेंग्यूचे ८२, मलेरियाचे ६७ रूग्ण निष्पन्न : शहरात ६१ रूग्ण डेंग्यूबाधित, उपाययोजना आवश्यक

Dangue and malaria woes in the district! | जिल्ह्यात डेंग्यूसह मलेरियाचाही कहर!

जिल्ह्यात डेंग्यूसह मलेरियाचाही कहर!

Next
ठळक मुद्दे१ जानेवारी ते ५ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत जिल्ह्यात डेंग्यूचे ३४० संशयित रूग्ण आढळले आहेत़आतापर्यंत जिल्ह्यात मलेरियाचे ६७ रूग्ण आढळले आहेत़डेंग्यू, मलेरियाचा आढावा आवश्यक


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  :  शहरासह जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचा कहर सुरूच असून आतापर्यंत जिल्ह्यात ३४० संशयित रूग्ण आढळले आहेत़ त्यापैकी ८२ रूग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्यात धुळे शहरात ३४० पैकी २६६ रूग्ण आढळले असून ६१ जणांना डेंग्यू झाल्याचे जिल्हा हिवताप विभागाने स्पष्ट केले़ 
शहरात सर्वाधिक रूग्ण
१ जानेवारी ते ५ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत जिल्ह्यात डेंग्यूचे ३४० संशयित रूग्ण आढळले आहेत़ त्यात धुळे शहरात २६६, धुळे तालुक्यात ५०, शिंदखेडा तालुक्यात ८, शिरपूर तालुक्यात ४ व साक्री तालुक्यात १२ संशयित रूग्ण आढळले आहेत़ तर डेंग्यू निष्पन्न झालेल्या रूग्णांमध्ये धुळे शहरात सर्वाधिक ६१, धुळे तालुक्यात ११, शिंदखेडा तालुक्यात ३, शिरपूर तालुक्यात ० आणि साक्री तालुक्यात १ रूग्णाचा समावेश आहे़
मलेरियाचे ६७ रूग्ण
जिल्ह्यात गेल्या महिनाभरात रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे़ आतापर्यंत जिल्ह्यात मलेरियाचे ६७ रूग्ण आढळले आहेत़ त्यात धुळे शहरात ९, धुळे तालुक्यात ५, शिंदखेडा तालुक्यात १६, शिरपूर तालुक्यात १२ व साक्री तालुक्यात २५ रूग्ण आढळले आहेत़ डेंग्यू, मलेरियाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना आहेत़
डेंग्यू, मलेरियाचा आढावा आवश्यक
शहरात डेंग्यू, मलेरियाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन युध्दपातळीवर उपाययोजना आवश्यक असतांना मनपाचा कारभार सुस्त आहे़ महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधीही गंभीर आजारांच्या साथीबाबत केवळ बघ्याची भुमिका घेत असून आतापर्यंत एकही आढावा बैठक घेण्यात आलेली नाही़ त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे़
उपाययोजनांमध्ये वाढ डॉ. मोरे
शहरात उपाययोजनांमध्ये वाढ केली आहे़ मधल्या कालावधीत झालेल्या पावसामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या पोषक आजारांना अनुकूल वातावरण निर्माण झाले होते़ त्यामुळे रूग्णसंख्येत वाढ झाली होती़ त्यामुळे उपाययोजना प्रभावीपणे सुरू असून रूग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांनी सांगितले.



    

Web Title: Dangue and malaria woes in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.