दुतोंडी सापाचे आमिष दाखवून एकास गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 05:26 PM2018-01-07T17:26:51+5:302018-01-07T17:27:41+5:30

कुसुंब्यातील घटना : बुलढाणा येथील व्यक्तीस मारहाण, एकास अटक

Danti Das paap bacam show one | दुतोंडी सापाचे आमिष दाखवून एकास गंडा

दुतोंडी सापाचे आमिष दाखवून एकास गंडा

Next
ठळक मुद्देदुतोंडी साप असा कधीही कुठेही दिसत नाही़ दिसल्यास आपला आर्थिक फायदा होतो अशी अंधश्रध्दा आहे़याच अंधश्रध्देचा फायदा उचलत बुलढाण्याच्या एकाला लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला़ धुळे तालुका पोलीस घटनेचा तपास करीत आहेत़ 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दुतोंडी साप पाहण्यासाठी बोलाविलेल्या बुलढाणा येथील एकाला कुसुंबा (ता़ धुळे) येथे मारहाण करुन त्याच्याजवळील रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली़ याप्रकरणी  शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करुन तालुका पोलिसांनी एकास अटक केली आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठाविली आहे. 
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथील शेख सिध्दीक शेख सांडू (५२) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, दुतोंडी साप पाहण्यासाठी काही लोकांनी त्यांना  धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे बोलाविले़ मालेगाव येथील नवे बसस्थानकाजवळ राहणारे लियाकत खा हमीद खा यांना सोबत घेवून ते शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे आले. त्यांना कावठी रोडवरील एका घरात बोलाविण्यात आले़ त्याठिकाणी गेल्यावर त्यांना  दमदाटी करुन मारहाण करण्यात आली.  तसेच त्यांच्याकडून २ तोळे सोन्याची चेन, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, मोबाईल आणि १२ हजार ५०० रुपये रोख असा एकूण ५६ हजाराचा मुद्देमाल लुटण्यात आला़ घटनेनंतर संशयित फरार झाले.  मारहाणीत लियाकत खा हमीद खा (रा़ नवे बसस्थानक, मालेगाव) यांना दुखापत झाली आहे़ त्यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी शेख सिध्दीक शेख सांडू (रा़ देऊळगाव जि़ बुलढाणा) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, विनोद चव्हाण (रा़ अजनाळे ता़ धुळे), शाका दंडन चव्हाण (रा़ जामदा), सोनू आणि गुड्डू (पूर्ण नाव माहित नाही) (दोघे रा़ साखरखेडा जि़ बुलढाणा) यांच्यासह ५ जणांविरुध्द भादंवि कलम ३९५, ३९७, ४२० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला़ 
चार दिवसांची कोठडी
याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी संशयित विनोद चव्हाण याला ताब्यात घेतले़ त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ बाकी फरार आरोपींचा शोध सुरु आहे़ 

Web Title: Danti Das paap bacam show one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.