कोरोनामुळे अंध व्यक्तीसमोर अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:58+5:302021-05-29T04:26:58+5:30
दुसऱ्या लाटेतही जिल्ह्यातील अंध व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु शासकीय पातळीवर कोरोना रुग्णांची एकत्रित आकडेवारी नसुन त्यात अंध, ...
दुसऱ्या लाटेतही जिल्ह्यातील अंध व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु शासकीय पातळीवर कोरोना रुग्णांची एकत्रित आकडेवारी नसुन त्यात अंध, अपंग आदींची आकडेवारी वेगळी केलेली नसल्याचे दिसुन आले. अंध व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी त्यांना काय हवे काय नको, हे पाहणे देखील महत्त्वाचे होते. अशा रुग्णांवर उपचार करताना त्यांना हाताजवळ काय काय देता येईल, याची काळजी मात्र रुग्णालयांकडून घेण्यात येत होती; परंतु काही रुग्णांना शासकीय रुग्णालयांचादेखील काहीसा वाईट अनुभव आल्याचे दिसून आले आहे.
कोट
मला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मी शासकीय कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल झालो. ११ दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो. त्यावेळी मला खुप अडचणीचा सामना करावा लागला. डिस्चार्ज घेऊन घरी आल्यावर काही महिने घरीच होतो. सध्या मी कोरोनावर मात करून काम करत आहे.
-विजय जाधव
कोरोनाचा पहिल्या टप्यात मला कोरोनाची लागण झाली. कोरोना माझ्यावर सर्वच जनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. सरकारी दवाखान्यात उपचार करीत असतांना काहीकडून सहनभुती मिळाली तर काहींनी अंध म्हणुन दुर्लक्ष केले. सध्या काही महिन्यापासून घरीच आहे.
-पंकज पाटील
गेल्या काही वर्षापासून प्रहार व राष्ट्रीय दृटीहिन संघाचे काम करतो. अंध व दिव्यांग व्यक्तींना शासकीय कामात अडचणी येवू नये, याासाठी प्रयत्न करतो. कोरोना काळात अनेकानी माणुसकी विसरली होती. त्यावेळी अंध व दिव्यांग व्यक्तींना मदतीसाठी अडचणीला सामाेरे जावे लागले.
चंद्रकांत पाटील( राष्टीय दृष्टीहिन संघ सचिव)
कोरोनाकाळात आता त्यांनी फोनवरून संपर्क साधून त्यांना योगासन, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे आदींसह इतर महत्त्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन करीत आहोत. यासाठी आमची टीमदेखील काम करीत आहे.
(ॲड. कविता पवार, प्रहार क्रांती संघटना शहराध्यक्षा)