अपघातातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:30 PM2018-02-22T17:30:26+5:302018-02-22T17:30:59+5:30
घाणेगाव, अजंग येथील वेगवेगळ्या घटना : पोलिसात नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री तालुक्यातील घाणेगाव येथील महिला आणि धुळे तालुक्यातील अजंग येथील वृध्द या दोघांचा अपघात झाला होता़ उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली़ याप्रकरणी दोनही घटनांची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली़
घाणेगाव येथील घटना
साक्री तालुक्यातील खंडलाय गावाकडे जाण्यासाठी हट्टीबुद्रुक फाट्यावर अरुणाबाई बापू वाघ (४०) ही महिला आपल्या बापू पांडू वाघ या पतीसोबत एसटीची वाट पहात उभी होती़ पण, बºयाच वेळ होऊनही एसटी न आल्यामुळे बापू वाघ यांनी अरुणबाईला एका दुचाकीवर बसवून दिले़ हट्टी बुद्रुक ते आयणे रोडवर दुचाकीवरुन ही महिला खाली पडली़ तिला डोक्याला जबर दुखापत झाली़ अपघाताची ही घटन १५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली़ तिला धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली़ या घटनेची नोंद निजामपूर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी नोंदविण्यात आली़ घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी बी़ एम़ रायते करीत आहेत़
अजंग येथील घटना
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळ्याकडून पारोळाकडे जाणाºया अज्ञात वाहनाची धडक रस्ता ओलांडणारे वाल्मिक चिंधा पाटील (७२) यांना जोरदार बसली़ अपघाताची ही घटना २ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात वाल्मिक पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली़ या घटनेची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी करण्यात आली़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आऱ सी़ वाघ करत आहे़