मृतांची संख्या २०० वर पोहोचली, १६२ अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 07:42 PM2020-08-21T19:42:34+5:302020-08-21T21:14:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील मृतांची संख्या २०० वर पोहोचली आहे. शुक्रवारी आणखी १६२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :
जिल्ह्यातील मृतांची संख्या २०० वर पोहोचली आहे. शुक्रवारी आणखी १६२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये, दोंडाईचा येथील ७५ वर्षीय महिला, ५८ वर्षीय पुरुष व धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
शुक्रवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ६३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील ११, शिरपूर तालुक्यातील दोन, साक्री तालुक्यातील ४८ व शिंदखेडा तालुक्यातील ३८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ५१७ इतकी झाली आहे.