उष्माघाताने तिसगाव ढंढाणे येथील दोन गायींचा मृत्यू
By admin | Published: April 6, 2017 05:27 PM2017-04-06T17:27:07+5:302017-04-06T17:27:07+5:30
धुळे तालुक्यातील तिसगाव ढंढाणे येथे उष्माघातामुळे दोन दुधाळ जर्सी गायींचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 6 रोजी घडली.
Next
तिसगाव ढंढाणे,दि.6- धुळे तालुक्यातील तिसगाव ढंढाणे येथे उष्माघातामुळे दोन दुधाळ जर्सी गायींचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 6 रोजी घडली. पशुवैद्यकीय अधिका:यांनी शवविच्छेदन अहवालात उष्माघातानेच गायींचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. या मुळे शेतक:याचे 1 लाख 22 हजारांचे नुकसान झाले आहे.
ढंढाणे येथील देवीदास होळकर पाटील यांच्या मालकीच्या या गायी होत्या. शेतीतील नापिकीला कंटाळून म्हणून जोडधंदा म्हणून एक लाख रुपये व्याजाने घेऊन त्यांनी 15 दिवसांपूर्वी एक लाख 22 हजार रुपयांत या दोन जर्सी गायी आणल्या होत्या. एक गाय एका वेळी 7-8 लिटर देत असे. दोन्ही वेळचे दूध मिळून 28 ते 30 लिटर दूध डेअरीवर देत असत. बुधवारी नेहमीप्रमाणे गायी घरासमोरील गोठय़ात बांधलेल्या होत्या. अचानक घेरी येऊन एक गाय खाली कोसळली. ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सांगळे यांना पाचारण केले. त्यांनी येऊन उपचारांची शर्थ केली. परंतु गायीने प्राण सोडले. त्याचवेळी दुस:या गायीचीही अवस्था अत्यवस्थ झाली. उन्हाच्या उष्ण झळांमुळे उष्माघात झालेल्या गायींनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. दुस:या गायीचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला.