तळ्यात बुडून दोन शेतक-यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 04:48 PM2018-12-28T16:48:23+5:302018-12-28T16:59:19+5:30
दुरुस्तीसाठी गेल्याने मृत्यू
न्याहळोद : शेततळ्याजवळ काम करीत असतांना पाण्यात बुडवून दोन शेतकºयांचा दुदैर्वी अंत झाला. याठिकाणी हे दोघेच असल्याने अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही़
शुक्रवार २८ रोजी सकाळी परमेश्वर दौलत रोकडे (४५) व जगदीश संतोष महाजन (२८) हे आपल्या शेतात काम करीत होते. खूप वेळ झाला तरी त्यांचा फोन लागत नसल्याने लहान भाऊ कैलास रोकडे हे त्यांचा शोध घेऊ लागले़ मोटारसायकल शेतातच असल्याने तिथेच शोध सुरू असतांना शेततळ्याजवळ त्यांच्या चपला दिसल्या. यानंतर त्याने घाबरून गावात घटनेची माहिती फोनवर सांगितली. गावातील तरुण शेततळ्यात आले असता सुमारे दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले़ त्यांचा कमरेला ठिबक सिंचनाच्या नळ्या बांधलेल्या आढळून आल्या. त्यावरून अपघातात एकमेकांना वाचविण्यात दोघे बुडाले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़ परमेश्वर रोकडे हे प्रगतशील शेतकरी होते. शासनाच्या नियमानुसार शेततळे करण्यात आले होते. सुरक्षितता देखील होती मात्र, किरकोळ दुरुस्ती साठी गेलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू झाला.
परमेश्वर व जगदीश हे अनेक वर्षांपासून एकत्र काम करीत होते़ या दुर्घटनेमुळे या दोघांना अंत्ययात्रात्रेत सोबतच राहण्याची वेळ आली.
परमेश्वर यांच्या पश्चात आई, चार भाऊ, पत्नी , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे तर जगदीश यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, व मुलगा आहे़ या घटनेमुळे न्याहळोद गावात शोककळा पसरली आहे़