कर्जमुक्त झालेल्या शेतकरी महिलांचं रक्षाबंधन असणार खास; उद्धव ठाकरेंना पाठवणार राखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2022 11:46 AM2022-08-03T11:46:07+5:302022-08-03T11:47:16+5:30
राखीसोबतच "आम्ही शेतकरी उद्धव साहेबांसोबत" असल्याचे म्हणत या आशयाचे पत्र देखील मातोश्रीवर पाठवले जाणार आहे.
धुळे- भाऊ आणि बहिणीचा पवित्र मानला जाणारा रक्षाबंधन हा सण तोंडावर येऊन ठेवलेला असताना धुळ्याच्या साक्री तालुक्यातून कर्जमुक्त झालेल्या शेतकरी महिलांकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रक्षाबंधनांच्यानिमित्ताने 'राखी' पाठवणार आहेत.
राखीसोबतच "आम्ही शेतकरी उद्धव साहेबांसोबत" असल्याचे म्हणत या आशयाचे पत्र देखील मातोश्रीवर पाठवले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनोखी रक्षाबंधन साजरी होणार आहे.
यंदाच्या रक्षाबंधनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महिलांतर्फे राख्यांसह अनोखी भेट पाठवली जात आहे. या पत्रामध्ये आपल्या भावाच्या आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे राहणार असल्याचा देखील उल्लेख या पत्रकात करण्यात आला आहे.
धुळे- भाऊ आणि बहिणीचा पवित्र मानला जाणारा रक्षाबंधन हा सण तोंडावर येऊन ठेवलेला असताना धुळ्याच्या साक्री तालुक्यातून कर्जमुक्त झालेल्या शेतकरी महिलांकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रक्षाबंधनांच्यानिमित्ताने राखी पाठवणार आहेत. #adityathakrey#UddhavThackeraypic.twitter.com/zeMI9O4R3J
— Lokmat (@lokmat) August 3, 2022