कर्जापोटी फक्त मुद्दल रकमेची वसुलीचा धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:22 AM2018-02-15T11:22:34+5:302018-02-15T11:23:54+5:30
अल्पमुदतीच्या कर्जासाठी शून्यटक्के व्याजदर
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : २०१७-१८ मध्ये एक लाखाच्या आत अल्प मुदत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी सभासदांकडून व्याजाची वसुली न करता फक्त मुद्दल वसूल करण्याचा व शुन्य टक्के व्याजदराने प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. नियर्णयामुळे शेतकरी सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे.
धुळे व नंदुबार जिल्हा बॅँक संचालक मंडळाची बैठक बॅँकेचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला.
संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांनी व्याजाची रक्कम न भरता घेतलेल्या मुद्दलाची रक्कम ३१ मार्च २०१८च्या आत भरायची आहे. सभासदाची व्याजाची रक्कम शासनाकडून भरपाई मिळण्यासाठी बॅँक शासनाकडे प्रस्ताव पाठविणार आहे. तसेच एक लाखावरील कर्ज घेणाºया सभासदांना चार टक्के व्याज सवलत मिळणार आहे.
दरम्यान केंद्र, राज्य शासन, नाबार्डच्या धोरणानुसार एक लाखपर्यंतच्या पीक कर्जावर शुन्य टक्के व्याजाने प्राथमिक विविध कार्यकारी व आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या सभासदांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. शुन्य टक्के व्याजाची झळ संस्थेच्या व्यवस्थापन खर्चाला बसू नये म्हणून संस्थेच्या दोन टक्के व्याज उत्पन्नाच्या स्वतंत्र निधी तीन कोटीची तरतूद बॅँकेने केली आहे. २०१८-१९ या वर्षासाठी नवीन अल्प मुदत पीक कर्जवाटप एप्रिल २०१८च्या तिसºया आठवड्यात नियमित सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तसेच २०१७पूर्वीची थकबाकी असलेली सर्व कर्ज जुन्या लेखानोंद पद्धतीने व्यवहार करून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. एक लाखावरील पीक कर्जाची दोन टक्के व्याजाची रक्कम संबंधित शेतकºयांकडून शासन निर्णयानुसार वसुल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली आहे.