पाचकंदिल मार्केटबाबत लवकरच निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2017 04:13 PM2017-06-29T16:13:44+5:302017-06-29T16:13:44+5:30
विभागीय आयुक्तांसोबतच्या बैठकीतील चर्चेबाबत अधिकारी, पदाधिका:यांचेही ‘तोंडावर बोट’
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.29 - शहरातील पाचकंदिल मार्केटचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर नेमण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक बुधवारी नाशिक विभागीय आयुक्तांकडे झाली़ विभागीय आयुक्त हे बैठकीचे अध्यक्ष असून त्यांनी सर्वाचे म्हणणे ऐकून घेत आपण निर्णय घेऊन कळविणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आल़े मात्र या बैठकीबाबत अधिका:यांसह पदाधिका:यांनीही तोंडावर बोट ठेवल्याचे दिसून आल़े
नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस आमदार अनिल गोटे, जिल्हाधिकारी डॉ़ दिलीप पांढरपट्टे, महापौर कल्पना महाले, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, नगरसेवक चंद्रकांत सोनार, मनपा अभियंता कैलास शिंदे व प्ऱनगररचनाकार प्रदीप चव्हाण हे उपस्थित होत़े या बैठकीत विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासन, महापालिका व आमदार अनिल गोटे यांचे म्हणणे ऐकून घेतल़े तसेच कागदपत्रांची पाहणी करून पाचकंदिल मार्केटची पाश्र्वभूमी व सद्यस्थिती जाणून घेतली़ मनपाने पाचकंदिल परिसरात नवीन मार्केट प्रस्तावित केल्याची माहिती दिली़ अखेर विभागीय आयुक्तांनी सर्वाचे म्हणणे ऐकून घेत समितीचा अध्यक्ष म्हणून आपण निर्णय घेऊ व तो सर्वाना कळवू, असे सांगितल़े