ईव्हीएम हटावो, लोकशाही बचाओ घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:15 PM2019-03-11T22:15:18+5:302019-03-11T22:15:36+5:30
जिल्हा प्रशासन : वंचित बहुजन आघाडीची मागणी
धुळे : भारत निवडणुक आयोगाकडून घेण्यात आलेल्या सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात यावी या मागणीसाठी ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाव आंदोलन करीत सोमवारी जिल्हा प्रशासनाला भरिप बहूजन महासंघ वंचित बहूजन आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले़भारिप बहूजन महासंघ, वंचित बहूजन आघाडीच्यावतीने राज्यभरात इव्हीएम हटाओ लोकशाही बचाव या संदर्भात आंदोलन केली जात आहे़ जिल्हाप्रशासनाने आंदोलनाची दखल येवून इव्हीएम मशीनवर निवडणुका न घेता मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यात यावा अशी मागणी होत आहे़ काही दिवसापुर्वी इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याने उघड झाले आहे़ त्यामुळे चुकीचे प्रतिनिधी निवडुन आले आहे़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटू शकत नाही़ प्रशासनाने दखल घ्यावी यामागणीसाठी घंटानांद आंदोलन करण्यात आले़
निवेदनावर राज चव्हाण, भैय्या पारेराव, अॅड़एकनाथ भावसार, अरविंद निकम, योगेश जगताप, देविदास जगताप, योगेश बेडसे, सुरेश मोरे, नाना महाले, भावसाहेंब शिरसाठ, राकेश खैरनार, दिलीप देवरे, वैशाली पवार आदींच्या सह्या आहेत़