महापुरूषांच्या स्मारकाजवळील दारु दुकाने हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 09:38 PM2020-09-10T21:38:26+5:302020-09-10T21:38:46+5:30

तरुणाची मागणी : बेमुदत धरणे आंदोलनाचा दहावा दिवस

Delete liquor stores near monuments to great men | महापुरूषांच्या स्मारकाजवळील दारु दुकाने हटवा

dhule

Next

धुळे : महापुरूषांच्या स्मारकाजवळील दारु दुकाने हटविण्याची मागणी करीत गौतम भिमराव बोरसे या तरुणाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचा गुरुवारी दहावा दिवस होता.
महाराष्ट्र राज्य माथाडी विकास आणि जनरल कामगार युनियनचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले गौतम बोरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरातील खोपडे वाईन आणि विनोद वाईन शॉप ही दोन दारु दुकाने महापुरूषांच्या पुतळ्याशेजारी आहेत. या परिसरात नेहमी मद्यपिंचा वावर असतो. त्यामुळे महापुरूषांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुळात शासन नियमाप्रमाणे महापुरूषांच्या स्मारकापासून शंभर मीटर अंतरापर्यंत दारु दुकानांना परवानगी नसते. परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दारु व्यावसायिकांशी लागेबांधे असल्याने कायद्यातील पळवाटा शोधून त्यांचा परवाना दरवर्षी नुतनीकरण केला जातो. या विरोधात आंदोलन छेडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून परवानगी मागितली होती. परंतु कोरोना संसर्गामुळे परवानगी मिळत नव्हती. परंतु दररोज विविध पक्ष, संघटनांची आंदोलने होत आहेत. त्यामुळे या तरुणाने देखील १ सप्टेंबरपासून धुळे शहरातील क्युमाईन क्लबजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा ११ वा दिवस आहे. अजुन प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही.

Web Title: Delete liquor stores near monuments to great men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे