पीएम स्वनिधीला बॅकांकडून खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 10:33 PM2021-01-24T22:33:51+5:302021-01-24T22:34:27+5:30
जिल्ह्यात जनजागृतीचा अभाव, व्यवसायिकांना तातडीने लाभ देण्याची अपेक्षा
धुळे : येथील हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची आर्थिक उन्नती व व्यवसायात वृध्दी हाेण्यासाठी केद्र शासनाच्यावतीने पीएम स्वनिधी योजना राबविण्यात येत आहे. परंतू या योजनेसाठी बॅकाकडून खोडा दिला जात असल्याने अद्याप या योजनेला हवा तसा प्रतिपाद मिळालेला दिसून येत नाही.
मनपाकडून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ फेरीवाल्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी काही महिन्यापूर्वी शहरातील फेरीवाल्याचे सर्वेक्षण करून नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार टप्या-टप्यात या योजनेचा लाभ फेारीवाल्यांना दिला जात आहे. मनपाकडून पीएम स्वनिधी योजनेच्या लाभासाठी बॅकेत प्रस्ताव पाठविण्यात येतात. लाभार्थांची संपूर्ण माहिती घेऊन बँकेद्वारे अर्थसहाय्य केले जाते. मात्र काही बॅकाकडून पीएम स्वनिधी योजनेच्या लाभ दिला जात नसल्याने तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही योजना यशस्वी करण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.