धुळे जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी ६ लाख रोपांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 03:42 PM2018-05-30T15:42:35+5:302018-05-30T15:42:35+5:30

मोहीम : ५४१ ग्रामपंचायतींमध्ये १०० टक्के खोदकाम पूर्ण; उद्या नाशिक येथे आढावा बैठक

Demand for 6 lakh seedlings for tree plantation in Dhule district | धुळे जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी ६ लाख रोपांची मागणी

धुळे जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी ६ लाख रोपांची मागणी

Next
ठळक मुद्देशासनाने यंदा ग्रामपंचायतींसोबत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासाठी ८ हजार ४०० रोपांची लागवड करण्याचे आदेश दिले होते.परंतु, जागेची अडचण विचारात घेता, जिल्हा मुख्यालयाला मिळालेले उद्दिष्ट हे चारही तालुक्यातील ग्रामपंचायतींनीच पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय पातळीवरून देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्याला प्राप्त उद्दिष्टाची पूर्ती करून २१०० रोपांची लागवड करावी

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :    शासनाने सूचित केल्या प्रमाणे यंदाही जिल्ह्यात १ ते ३१ जुलै दरम्यान वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून यंदा वृक्ष लागवड करण्यासाठी ५ लाख ९८ हजार ६३१ रोपांची मागणी वन विभागाकडे करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे देण्यात आली  आहे. दरम्यान, वृक्ष लागवड मोहीमेसंबंधी गुरूवारी, ३१ रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

वृक्ष लागवड मोहीमेंतर्गत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींना ५ लाख ९० हजार २३१ वृक्षांची तर जिल्हा परिषद मुख्यालयाला स्वतंत्र ८ हजार ४०० वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट असे एकूण ५ लाख ९८ हजार ६३१  वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहीमेसाठी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ग्रामपंचायतस्तरावर खड्डे खोदण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींर्गत खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले असून त्याबाबत आॅनलाइन माहिती वन विभागाच्या संकेतस्थळावर भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्ध
वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात प्राप्त झालेले उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे वृक्ष लागवडीबाबतची मागणी वन विभागाकडे केली आहे. परंतु, जिल्ह्यासाठी प्राप्त उद्दिष्टांऐवढे रोपे शिल्लक असल्याची माहिती ग्रामपंचायत शाखेतर्फे देण्यात आली आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण या विभागांच्या सहकार्याने ही मोहीम राबविली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने रोपे ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिले जातील, असे सांगण्यात येत आहे. 

Web Title: Demand for 6 lakh seedlings for tree plantation in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.