आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी दोंडाईचा येथे कडकडीत बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:25 PM2018-02-21T12:25:29+5:302018-02-21T12:27:26+5:30

बालिका अत्याचार प्रकरण : व्यापाºयांचा उत्स्फूर्त सहभाग

For the demand for the arrest of the accused, the Doodee clandestine stopped | आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी दोंडाईचा येथे कडकडीत बंद 

आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी दोंडाईचा येथे कडकडीत बंद 

Next
ठळक मुद्देआरोपींच्या मागणीसाठी दोंडाईचा शहरात कडकडीत बंद व्यापारी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, अत्यावश्यक सेवा वगळल्यासलग तीन दिवसांपासून आंदोलनांद्वारे पाठपुरावा 

लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : शहरात बालिकेवर झालेल्या अत्याचारप्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी व्यापारी आणि नागरिकांनी पुकारलेल्या बंदला बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील संतप्त नागरिकांनी अपर तहसीलदार कार्यालयावर यापूर्वी गेले दोन दिवस सलग मोर्चे काढून संशयित आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केलेली आहे. 
याप्रकरणात पीडित बालिकेवर अत्याचार करणाºया नराधमास आणि संशयित आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातील व्यापारी आणि नागरिकानी स्वयंस्फूर्तीने बुधवारी दोंडाईचा बंद पुकारला आहे. दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत. या ‘बंद’मधून रूग्णवाहिका, दूध आदीसारख्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. 
दरम्यान, या घटनेतील संशयित आरोपी व त्या अज्ञात नराधमास अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी अपर तहसीलदार कार्यालयावर मंगळवारी सकाळी मूक मोर्चा काढला होता. यावेळी संतप्त महिलांनी निवेदन देतांना आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. 

 

Web Title: For the demand for the arrest of the accused, the Doodee clandestine stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.