पोलीस अधिकाºयाला भोवली लाचेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 06:38 PM2018-11-14T18:38:19+5:302018-11-14T18:39:31+5:30
एसीबी : ध्वनीमुद्रीत झालेले संभाषण निष्पन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणातून १० हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे तपासातून निष्पन्न झाल्याने सहायक पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाबुराव चौधरी (५७) या संशयितास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली़
धुळे तालुक्यातील मुकटी येथील शेतात मेंढ्या घुसल्याच्या कारणावरुन धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे़ दाखल गुन्ह्यात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी धुळे तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत मुकटी दूरक्षेत्रात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाबुराव चौधरी यांच्याकडून १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली जात होती़ परंतु लाच देण्याची तयारी नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़ दाखल तक्रारीच्या अनुषंगाने ४ आॅक्टोबर २०१८ रोजी पडताळणी केली असता तडजोडीअंती १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरुन निष्पन्न झाल्याने चौधरी यांना बुधवार १४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली़ त्यांच्या विरोधात धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक (संशोधन) अधिनियम सन २०१८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलीस निरीक्षक पवन देसले आणि त्यांच्या पथकातील नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संदीप सरग, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सतिष जावरे, प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, सुधीर सोनवणे, शरद काटके, भूषण खलाणेकर, प्रकाश सोनार, संदिप कदम, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केलेली आहे़ त्यांना अटक करण्यात आलेली आहे़