पाणी योजनेच्या दुस:या टप्प्यातील निधीची मागणी!
By admin | Published: January 20, 2017 12:13 AM2017-01-20T00:13:24+5:302017-01-20T00:13:24+5:30
136 कोटींची पाणी योजना : नगरविकास विभागाला उपयोगिता प्रमाणपत्र सादर
धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटींच्या पाणी योजनेच्या दुस:या टप्प्यातील निधीची मागणी मनपातर्फे शासनाकडे करण्यात आली आह़े त्यासाठी पहिल्या टप्प्यातील निधीतून आतार्पयत झालेल्या खर्चाचे ‘उपयोगिता प्रमाणपत्र’ शासनाला सादर करण्यात आले आह़े
शहरात 136 कोटींच्या पाणी योजनेचे काम सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून युद्धपातळीवर सुरू आह़े मोहाडी, शाळा क्रमांक 28, चक्करबर्डी व तुळशीरामनगर येथे जलकुंभांची कामे सुरू असून नगावबारीला एमबीआर जलकुंभासाठी खोदाईचे काम सुरू करण्यात आले आह़े या कामाची मजीप्राच्या वरिष्ठ अधिका:यांनी गुरुवारी पाहणी केली़ त्याचप्रमाणे स्वामी समर्थनगर व प्रियदर्शनी सोसायटीत प्रस्तावित जलकुंभांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत़ त्याचप्रमाणे जलवाहिन्या टाकण्याची कामेदेखील काही ठिकाणी सुरू आहेत़
मोहाडी परिसरात जलवाहिनी टाकण्यासाठी महामार्गावर खोदकाम करावे लागणार असल्याने त्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांशी चर्चा केली आह़े त्यामुळे त्याबाबतही लवकरच निर्णय होऊ शकतो़ महापालिकेला पाणी योजनेसाठी पहिल्या टप्प्यात 49 कोटी 64 लाख 80 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ त्यात महापालिकेचा हिस्सा टाकून एकूण निधीची रक्कम 62 कोटी असून त्यातून 27 कोटी रुपयांचा निधी महापालिकेने खर्च केला असून उर्वरित निधी मजीप्राकडे वर्ग करण्यात आला आह़े एकूण निधीपैकी आतार्पयत 43 कोटी 1 लाख 86 हजार रुपयांचा अर्थात 77़1 टक्के निधी खर्च झाला आह़े त्यामुळे महापालिकेने लागलीच दुस:या टप्प्यातील निधीची मागणी शासनाकडे केली आह़े दुस:या टप्प्यातील निधीपूर्वी शासनाच्या समितीकडून झालेल्या कामांची पाहणी केली जाईल़ निधीसाठी राज्य शासनामार्फत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करावा लागणार असल्याने महापालिकेने आतापासूनच प्रक्रियेला सुरुवात केली आह़े पाणी योजनेत झालेल्या वादविवादांमुळे जवळपास वर्षभर योजनेचे काम बंद होत़े सदर योजनेत जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्यासह सात जलकुंभ, जलवाहिन्यांची कामे या योजनेत प्रस्तावित आहेत़ दुस:या टप्प्यातील निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असले तरी पाठपुरावा आवश्यक आह़े