धुळयातील दलालांच्या संपत्तीच्या जप्तीची मागणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 02:30 PM2018-07-28T14:30:59+5:302018-07-28T14:32:15+5:30

आमदार अनिल गोटे, आदिवासींच्या मेळाव्यात प्रतिपादन

Demand for the seizure of properties of Dhule broker | धुळयातील दलालांच्या संपत्तीच्या जप्तीची मागणी करणार

धुळयातील दलालांच्या संपत्तीच्या जप्तीची मागणी करणार

Next
ठळक मुद्दे-दलालांच्या संपत्तीच्या जप्तीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार- उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार-आदिवासींच्या संपत्तीला अ‍ॅट्रोसिटीनुसार संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राष्ट्रीय महामार्गांच्या भूसंपादनात राजकीय दलालांनी आदिवासींची फसवणूक केली आहे़ त्यामुळे त्यांच्या संपत्तीच्या जप्तीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असून आदिवासींच्या न्यायासाठी  उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अनिल गोटे यांनी मेळाव्यात केले़
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व २११ च्या भूसंपादनात आदिवासी नागरिकांच्या कोट्यवधी रूपयांच्या जमिनी राजकीय दलालांनी लाटल्या़ आदिवासींच्या जमिनींची कागदपत्रे तयार करून त्यांच्याकडून स्वाक्षºया करवून घेतल्या़ परंतु अ‍ॅट्रोसिटी कायद्याच्या कलम ३ व ४ नुसार आदिवासींच्या संपत्तीला संरक्षण असल्याने दलालांनी करवून घेतलेली सर्व कागदपत्रे निरर्थक असल्याचे ते म्हणाले़ या मेळाव्याला भिमसिंग राजपूत, संजय बोरसे, नानासाहेब पवार, रवि मालचे उपस्थित होते़ 


 

Web Title: Demand for the seizure of properties of Dhule broker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.