भूखंड मालकाकडून लाखाची मागितली खंडणी; धुळ्यातील प्रकार, ३ जणांविरोधात गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: May 18, 2023 06:25 PM2023-05-18T18:25:09+5:302023-05-18T18:25:34+5:30
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खंडणीसह मारहाण केल्याची फिर्याद नमूद करण्यात आली.
धुळे : स्वमालकाचा भुखंड पाहण्यााठी गेलेल्या अरुण भगवंतराव मदने (रा. पवननगर, चाळीसगाव रोड, धुळे) या ठेकेदाराकडून एक लाख रुपये खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अरुण मदने यांनी फिर्याद दाखल केली.
त्यानुसार, मदने हे स्व:मालकीचा भुखंड पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळेस या भुखंडाशी तुमचा काही संबंध नाही. तुम्हाला जर तो हवा असेल तर एक लाखाची खंडणी द्यावी लागेल असे तीन जणांनी एकत्र येऊन मदने यांना सांगण्यात आले. यावेळी तिघांसह मदने यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. एकाने त्याच्या हातातील सुरीने मदने यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांच्या छातीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर वार झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. तर दुसऱ्याने त्याच्या हातातील लाकडी काठीने तर तिसऱ्याने हाताबुक्याने मारहण केली. शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. असे मदने यांनी फिर्यादीत नमूद केलेले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खंडणीसह मारहाण केल्याची फिर्याद नमूद करण्यात आली.