कर्नाटक, आंध्र प्रदेशतील कलिंगडची धुळ्यात वाढली मागणी
By Admin | Published: April 27, 2017 03:36 PM2017-04-27T15:36:08+5:302017-04-27T15:37:03+5:30
धुळे जिल्ह्यातही कलिंगडाची नदीपात्रात शेती होत असताना तुटवडयामुळे व्यापा-यांकडून आंध्र प्रदेश, कर्नाटक व मराठवाड्यातून मोठया प्रमाणात कलिंगड आयात केली जात आहे.
ऑनलाइन लोकमत
शिरपूर, दि. 27 - उन्हाळयाच्या दिवसात कलिंगड या फळाला नागरिकांची विशेष पसंती असते. धुळे जिल्ह्यातही कलिंगडाची नदीपात्रात शेती होत असताना तुटवडयामुळे व्यापा-यांकडून आंध्र प्रदेश, कर्नाटक व मराठवाड्यातून मोठया प्रमाणात कलिंगड आयात केली जात आहे.
जिल्ह्यात जागोजागी कलिंगडांची दुकाने लागली असून १० रुपयांपासून तर १५ रुपये दराने या कलिंगडाची विक्री व्यापा-यांकडून केली जात आहे. शिरपूर जैन येथे दररोज दोन ते तीन ट्रक माल येत असून तो संध्याकाळपर्यंत विकला जात आहे. अनेक लघु व्यावसायिकदेखील याद्वारे अधिक उत्पन्न कमावत आहेत. वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीकाठावर व कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात याचे उत्पन्न घेतले जात आहे.
व्यापारी ग्राहकांना १० ते १५ रुपये किलो दराने कलिंगड विकत असले तरी व्यापा-यांना ते खरेदी करताना नगाप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. यावेळी लहान, मोठे फळ एकाच भावात व्यापा-यांना मिळत असून एकत्रित मालाचा काटा तोल काट्यावर करुन ट्रकचे वजन अंदाजे कमी करुन मालाची किंमत काढली जाते.
यामुळे भाव स्थिर राहत कमी जास्त होत असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत आंध्र प्रदेश, कर्नाटक, मराठवाडयातील कलिंगडाचा माल मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीस येत आहे.