कंकणाकृती सुर्यग्रहण पाहण्याचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 10:23 PM2019-12-25T22:23:38+5:302019-12-25T22:25:34+5:30
निमगुळ : न्यू इंग्लिश स्कूल व अंनिसचा उपक्रम
विंचूर : निमगुळ येथे सुर्यग्रहण पाहण्यासाठी २४ रोजी पूर्वतयारी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला.
२६ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. खगोल विज्ञानाचा हा नयनरम्य अविष्कार पाहण्याची संधी यानिमित्ताने आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रहणाविषयी असलेले गैरसमज दूर करून ग्रहताऱ्यांशी दोस्ती व्हावी, या उद्देशाने येथील न्यू इंग्लिश स्कूल व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निमगुळ शाखेच्या वतीने २४ रोजी जनजागृती करण्यासाठी सुर्यग्रहण पाहण्यासाठी पूर्वतयारी कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता विशिष्ट चष्मा वापरूनच ग्रहण पहावे, असे सांगून सुर्यग्रहणाविषयी माहिती देण्यात आली. तसेच सुर्यग्रहण कसे पहावे, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सूर्यग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्याचे आवाहन अंनिसचे दिलीप खिवसरा यांनी केले.