धुळ्यातील खासदार, आमदारांच्या घरासमोर निदर्शने

By admin | Published: June 7, 2017 05:18 PM2017-06-07T17:18:38+5:302017-06-07T17:18:38+5:30

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा : शेतक:यांच्या मागण्यासंदर्भात दिले निवेदन; पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त

Demonstrations at Dhule MP, MLA's house | धुळ्यातील खासदार, आमदारांच्या घरासमोर निदर्शने

धुळ्यातील खासदार, आमदारांच्या घरासमोर निदर्शने

Next

ऑनलाईन लोकमत

धुळे ,दि.7-  शेतक:यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता शासन दरबारी तातडीने करावी, या मागणीसाठी बुधवारी दुपारी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे खासदार व आमदारांच्या घरावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिका:यांनी शेतक:यांच्या व्यथा मांडल्या. गालबोट लागू नये, म्हणून धुळे शहरात आज सकाळपासूनच आमदार व खासदार यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला होता. 
शेतकरी संपाच्या पाश्र्वभूमीवर नाशिक येथे झालेल्या बैठकीत आमदार, खासदारांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापाश्र्वभूमीवर कॉ. शरद ढमाले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे शहरातील कल्याण भवनापासून मोर्चाला सुरुवात झाली. यात सहभागी कार्यकत्र्यानी घोषणा देत हा मोर्चा एका रांगेत निघाला शिवतीर्थ चौक, कमलाबाई कन्या शाळा, जुना आग्रा रोड, पारोळा रोड, गिंदोडिया चौकातून खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या घरावर आला. यावेळी मोर्चात सहभागी कार्यकत्र्यानी घोषणाबाजी करत शेतक:यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करावा, या मागणीचे निवेदन दिले. मंत्री डॉ. भामरे हे उपस्थित नसल्यामुळे कार्यकत्र्यानी निवेदन त्यांचे स्वीय सहाय्यक शांताराम पाटील व प्रदीप अडसूळ यांना दिले. यानंतर कार्यकर्ते पुढे आमदार अनिल गोटे यांच्या घराच्या दिशेने रवाना झाले.  पुढे आमदार कुणाल पाटील व आमदार डी. एस. अहिरे यांच्या घरावर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यानी मोर्चा नेत शेतक:यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. या मोर्चात कॉ.रामसिंग पाटील, करणसिंग कोकणी, शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष रवी देवांग, यशवंत माळचे, साजूबाई गावीत, होमाबाई गावीत, राकेश सोनवणे, रामलाल गवळी, गोरख कुवर, निंदाबाई ब्राम्हणे, पवित्राबाई सोनवणे, केवळबाई पवार, उत्तम सोनवणे, विक्रम गावीत, लिलाबाई वळवी, सिंगा गावीत उपस्थित होते. 

Web Title: Demonstrations at Dhule MP, MLA's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.