सत्यशोधक जनआंदोलनतर्फे धुळ्यात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 05:38 PM2018-02-27T17:38:57+5:302018-02-27T17:38:57+5:30

दोंडाईचा, कळमसरे येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या घटनेचा निषेध; आरोपींवर तत्काळ कारवाई करा

 Demonstrations in Dhule by Satyashodhak Jan Andolan | सत्यशोधक जनआंदोलनतर्फे धुळ्यात निदर्शने

सत्यशोधक जनआंदोलनतर्फे धुळ्यात निदर्शने

Next
ठळक मुद्देदोंडाईचा व कळमसरे येथील घटनांमुळे शालेय विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनातर्फे विशेष उपाययोजना कराव्यात. महिला अत्याचारातील गुन्ह्यांसाठी स्वतंत्र विशेष न्यायालयाची स्थापना करावी. या दोन्ही घटनांचा सत्यशोधक जनआंदोलनच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  जिल्ह्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा) व अमळनेर (जि. जळगाव) तालुक्यातील कमळमसरे येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. या दोन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणा-या आहेत. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणा-या आरोपींवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी  सत्यशोधक जनआंदोलनच्या पदाधिका-यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने केली. 
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दोंडाईचा व कळमसरे येथील अल्पवयवीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे त्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दोन्ही घटनांचा निषेध आहे. याप्रकरणी दोषी आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कडक शिक्षा देण्यासाठी जलद न्यायालयात खटला चालवावा, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. 
यावेळी राकेश अहिरे, सिद्धांत बागुल, रोशन खैरनार, योगेश शिरसाठ, सुमेध सूर्यवंशी, चेतन नेरकर, मयूर सोनवणे, सनी शिरसाठ, भावेश हिरे, आकाश भामरे, आदित्य वसावे आदी उपस्थित होते. 
 

Web Title:  Demonstrations in Dhule by Satyashodhak Jan Andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.