कृषी विभागातर्फे गावागावात प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:09 PM2020-04-16T21:09:25+5:302020-04-16T21:10:04+5:30

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना : कृषी विस्तार अधिकारी देवरे यांनी केली जनजागृती

Demonstrations in the village by the Agriculture Department | कृषी विभागातर्फे गावागावात प्रात्यक्षिके

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे राबविण्यासाठी गावागावात प्रात्यक्षिके करुन दाखवली जात आहेत़ शिंदखेडा पंचायत समितीच्या कृषि कार्यालयाने गावागावात जावून मोहिम हाती घेतली आहे़
खलाणे गावातील चौकात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रातिनिधिक स्वरूपात प्रात्यक्षिक करण्यात आले़ या प्रात्यक्षिकात सरपंच कमलेश अहिरराव, ग्रामविकास अधिकारी डी.एन.पवार, किराणा व्यवसायिक सुनील जैन, जीवनावश्यक वस्तू खरेदी करणाऱ्या महिला अनिता गिरासे, दिलकोरबाई गिरासे, ग्रामपंचायत कर्मचारी, काही ग्रामस्थ अशा सर्व घटकांना सहभागी करुन घेत मार्गदर्शन केले़
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये शिंदखेडयाचे कृषी विस्तार अधिकारी गिरीधर देवरे यांनी पुढाकार घेतला असून कृषीशी संबंधित कामकाज करताना सार्वजनिक ठिकाणी माहिती पत्रके लावून कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सामाजिक अंतर किमान ५ फूट ठेवण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे.
कोरोनाची संसर्ग साखळी खंडीत करण्यासाठी लॉकडाउनचे काटेकोर पालन करा, विनाकारण बाहेर पडू नका, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी एका कुटूंबातील केवळ एका व्यक्तीनेच दक्षता घेवून बाहेर पडावे, गर्दी करु नये, नेहमी मास्क वापरावा, वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे विशेष घटक योजनेचे शिंदखेडा तालुका प्रभारी कृषी अधिकारी गिरीधर देवरे यांनी केले आहे.

Web Title: Demonstrations in the village by the Agriculture Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे