प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:31 PM2019-08-13T23:31:33+5:302019-08-13T23:31:54+5:30
आंदोलनाचा दुसरा टप्पा : मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांना दिले मागण्यांचे निवेदन
धुळे : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत निदर्शने करून मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांना दिले.
महाराष्टÑ राज्य ग्रामसेवक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्ट २०१९ पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या दुसºया टप्यात धुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी (कंत्राटी वगळून) आंदोलनात सहभागी झाले होते.
संघटनेतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांना निवेदन दिले.
त्यात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत विकास अधिकारीपद निर्मित व्हावे, ग्रामसेवक संवर्गास प्रवास भत्ता शासन निर्णयानुसार मंजूर करावा, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बदल होऊन पदवीधर ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात यावी, २०११च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदांची वाढ करावी ,ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यातील वेतनत्रृटी दूर करावी, आदी मागण्यांचा समावेश होता. यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच ग्रामसेविकांनी विविध घोषणा दिल्या. जिल्हाधिकाºयांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.